जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Indigo Airline प्रवाशांकडून आकारत आहे ‘क्यूट चार्ज’; काय आहे याचा अर्थ?

Indigo Airline प्रवाशांकडून आकारत आहे ‘क्यूट चार्ज’; काय आहे याचा अर्थ?

Indigo Airline प्रवाशांकडून आकारत आहे ‘क्यूट चार्ज’; काय आहे याचा अर्थ?

Indigo Airline प्रवाशांकडून आकारत आहे ‘क्यूट चार्ज’; काय आहे याचा अर्थ?

Indigo Airline Cute Charge: इंडिगो एअरलाइन्सकडून तिकिटांवर प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या ‘क्यूट चार्ज’बाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जुलै: इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांकडून तिकिटांवर आकारण्यात येणाऱ्या ‘क्यूट चार्ज’बाबत (Indigo Airline Cute charge) सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. एका युजरने ट्विटरवर इंडिगो एअरलाईन्सच्या तिकिटाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यातून क्यूट चार्जची माहिती समोर आली. इंडिगोनं क्यूट चार्जसाठी 100 रुपये आकारल्याचं दिसत आहे. हा स्क्रीनशॉट समोर येताच त्यावर अनेक मीम्स बनवले गेले. दरम्यान हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर इंडिगोच्या सेवेवर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शंतनू नावाच्या एका ट्विटर युजरने इंडिगोच्या तिकिटाचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. शेअर केलेल्या तिकिटाचा स्क्रीनशॉटमध्ये क्यूट चार्जच्या पुढे 100 रुपये शुल्क आकारल्याचं दिसत आहे. त्यानं क्यूट चार्जला हायलाइट केल्याचं दिसत आहे. स्क्रीनशॉट शेअर करताना शंतनूनं लिहिलंय की, “मला माहित आहे की मी वयानुसार अधिक सुंदर होत आहे, परंतु यासाठी इंडिगो माझ्याकडून शुल्क आकारेल, असा विचार मी कधीही केला नव्हता.” इंडिगोच्या या तिकिटात विमान भाडे, आसन शुल्क, सुविधा शुल्क, एअरपोर्ट सुरक्षा शुल्क आणि युजर डेव्हलमेंट फी याची माहिती होती.त्याखालोखाल क्यूट चार्जेसच्या नावानं 100 रुपये आकारले गेले आहेत. या ट्वीटला ट्विटवर आतापर्यंत 9 हजारांहून अधिक लाईक्स आणि 350 पेक्षा जास्त रिप्लाय आले आहेत. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर एका ट्विटर युजरने लिहिलं की, “काही हरकत नाही, जर कोणी मला क्यूट म्हटलं तर मी 100 रुपये देईन”. त्याच वेळी, एका वापरकर्त्यानं लिहिलं की, “तो दिवस दूर नाही जेव्हा सुरक्षा शुल्क, ग्राउंड स्टाफ, बोर्डिंग पास फी, पायलट आणि सह-पायलट सेवा शुल्क, एअर होस्टेस सेवा, पाणीपुरवठा शुल्क, शौचालय सेवा शुल्क, ट्रॉली सेवा शुल्क. इत्यादी शुल्क आकारले जाईल”

जाहिरात

हेही वाचा:  Solar Generator: वीज गेली तरी चिंता नाही! परवडणाऱ्या किंमतीत मिळत आहेत ‘पोर्टेबल सोलर जनरेटर’ क्यूट शुल्क का आकारलं जातं? याबाबत माहिती देताना एका ट्विटर युजरनं लिहिलं की, भारतीय विमानतळ प्राधिकरण प्रवाशांकडून क्यूट शुल्क आकारते, म्हणजेच ‘कॉमन यूजर टर्मिनल इक्विपमेंट’ आकारते. विमानतळावरील मेटल डिटेक्शन मशीन, एस्केलेटर आणि इतर उपकरणं वापरण्यासाठी हे शुल्क आकारलं जातं. क्यूट शुल्काला प्रवासी हाताळणी शुल्क असंही संबोधलं जातं. या आरोपांचीही होत आहे चर्चा- हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर, ग्राहकांना त्यांच्या फ्लाइट तिकिटांच्या किंमतीव्यतिरिक्त भरावे लागणारे अनेक छुपे शुल्क आणि करांवरही वाद सुरू झाला आहे. अतिरिक्त शुल्काची तक्रार करताना, एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं, “युजर्स डेव्हलमेंट चार्ज? इंडिगोद्वारे युजर्सला काय विकसित केलं जात आहे? एअरपोर्ट सिक्युरिटी फी? इंडिगो विमानतळांवर तैनात असलेल्या CISF जवानांच्या पगारासाठी योगदान देत आहे का? सीट फी? जर प्रवासी बसले नाहीत तर उड्डाण कसे करतील?”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात