Home /News /money /

अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येण्यास सुरुवात! एप्रिल-जून तिमाहीमध्ये भारताने बनवला निर्यातीचा रेकॉर्ड

अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येण्यास सुरुवात! एप्रिल-जून तिमाहीमध्ये भारताने बनवला निर्यातीचा रेकॉर्ड

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी अशी माहिती दिली आहे की, एप्रिल-जून 2021 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताने सर्वाधिक निर्यात केली आहे.

    नवी दिल्ली, 02 जुलै: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Coronavirus) प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येऊ लागली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली की, इंजिनिअरिंग, तांदूळ, ऑइल मील, समुद्री उत्पादनं यांच्यासह विविध क्षेत्रात चांगल्या प्रदर्शनामुळे देशात निर्यात (Export) चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून वाढून 95 अब्ज डॉलर झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी अशी अशी माहिती दिली आहे की, 2018-19 च्या एप्रिल-जूनच्या तिमाहीमध्ये ही निर्यात 82 अब्ज डॉलर होती. आर्थिक वर्ष 2021-22 एप्रिल-जून तिमाहीमध्ये निर्यात 51 अब्ज डॉलर होती. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये निर्यात 90 अब्ज डॉलर होती. गेल्या महिन्यात देशातील निर्यात 47 टक्क्यांनी वाढून 32 अब्ज डॉलर झाली आहे. एप्रिल-जून 2021 च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताने निर्यातीत बनवला रेकॉर्ड गोयल यांनी अशी माहिती दिली की, 'यावर्षी एप्रिल-जून तिमाहीमध्ये देशातील वस्तूंची निर्यात आतापर्यंतची सर्वाधिक राहिली आहे. मंत्रालयाकडून चालू आर्थिक वर्षात 400 अब्ज डॉलरचे निर्यात लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व संबंधितांशी मिळून काम केलं जाईल.' हे वाचा-खूशखबर! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, तुमचं नाव यादीत आहे का? पीयूष गोयल यांनी अशी माहिती दिली की, एप्रिलमध्ये जो एफडीआय प्राप्त झाला आहे तो गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 38 टक्क्यांहून जास्त आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड अर्थात डीपीआयआयटी (DPIIT) द्वारे 623 जिल्ह्यांमध्ये मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 50000 झाली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Economy

    पुढील बातम्या