जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ...म्हणून 7व्या दिवशी शेअर बाजार कोसळला, तुमचेही पैसे लागलेत पणाला

...म्हणून 7व्या दिवशी शेअर बाजार कोसळला, तुमचेही पैसे लागलेत पणाला

...म्हणून 7व्या दिवशी शेअर बाजार कोसळला, तुमचेही पैसे लागलेत पणाला

गेल्या सात दिवसात सेन्सेक्स जवळजवळ 1300 अंकांवर बंद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 09 मे : अमेरिका आणि चीनमधल्या ट्रेड वाॅरचा सिलसिला गुरुवारीही ( 9 मे ) सुरू राहिला. शेअर बाजार सातव्या दिवशीही कोसळला. गेल्या सात दिवसात सेन्सेक्स जवळजवळ 1300 अंकांवर बंद झाला. अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वाॅर वाढलंय. म्हणून मेटल शेअर्समधल्या मोठ्या घसरणीचा परिणाम घरगुती बाजारावरही झालाय. 30 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 230.22 अंक म्हणजे 0.61 टक्क्यांच्या घसरणीसह 37558.91 वर बंद झालाय. एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 57.65 अंक म्हणजे 0.51 टक्के घसरणीसह 11301.80वर बंद झालाय. तरुणांसाठी लष्कराचा मोठा प्लॅन - जास्त पगार, भरपूर सुट्ट्या आणि शेवटी 38 लाख आता गुंतवणूकदार काय करतील? तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळेच शेअर बाजार कोसळलाय. अजून काही दिवस हेच चित्र दिसेल. छोट्या गुंतवणूकदारांनी सध्ये शेअर बाजारात पैसे लावू नयेत. निवडणुकीनंतरच पैसे गुंतवावेत. मुंबईहून बँकाॅकला जा फक्त 10 हजार रुपयांत, ‘या’ विमानकंपनीनं दिलीय मोठी ऑफर शेअर बाजारात मोठी घसरण मिडकॅप इंजेक्सही लागोपाठ चौथ्या दिवशी घसरला. एका महिन्यात एस्काॅर्ट्स 20, तर रिलायन्स कॅपिटल 38 टक्के घसरला आहे. बीएसई मिडकॅप इंडेक्सची 0.19 टक्के घसरण होऊन 14355.43वर बंद झालाय**.** बीएसईचा स्माॅलकॅप इंडेक्समध्ये 0.38 टक्क्यांनी घसरण होऊन 14076.33वर बंद झालाय. तेल-गॅस शेअर्सकडूनही शेअर बाजाराला आधार मिळाला नाही. बीएसईचा आॅइल अँड गॅस इंडेक्सची 1.1 टक्के घसरण झालीय. मुंबईहून निघणाऱ्या पहिल्या Bullet Train मध्ये मिळतील ‘या’ सुविधा, पाहा VIDEO बँक निफ्टीही घसरणीसह बंद झाला. बँक निफ्टी 0.38 टक्के घसरून 28884.60 वर बंद झाला. पीएसयू बँक शेअर्सची खरेदी झाली. त्यामुळे निफ्टीचा पीएसयू इंडेक्स 0.25 टक्क्यांनी वाढून बंद झाला. मेटल, खासगी बँक आणि फार्मा शेअर्सनी बाजारावर जास्त दबाव टाकला. निफ्टीचा मेटल इंडेक्स 1.4 टक्क्यांनी, फार्मा इंडेक्स 0.29 टक्क्यांनी आणि फायनॅन्शियल सर्विसेज इंडेक्स 0.34 टक्क्यांच्या घसरणीनं बंद झाला. शेअर बाजारात पीएसयू बँक, आयटी, एफएमसीजी, मीडिया आणि रियल्टी शेअर्सचा आधार मिळाला. निफ्टीचा आयटी इंडेक्स 0.44 टक्के, मीडिया इंडेक्स 3.8 टक्के, एफएमसीजी इंडेक्स 0.3 टक्के आणि रियल्टी इंडेक्स 0.34 टक्क्यांनी वधारून बंद झाला. VIDEO : भर रॅलीत जीपवर चढून तरुणीने केलं सनी देओलला KISS

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: sensex
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात