मराठी बातम्या /बातम्या /मनी /जनरल तिकीटाने स्लीपर कोचमधून प्रवास करता येतो का? नेमका काय आहे नियम

जनरल तिकीटाने स्लीपर कोचमधून प्रवास करता येतो का? नेमका काय आहे नियम

 जनरल तिकीट काढून स्लीपर कोचच्या डब्यातून प्रवास करत असाल तर नियम जाणून घ्या.

जनरल तिकीट काढून स्लीपर कोचच्या डब्यातून प्रवास करत असाल तर नियम जाणून घ्या.

जनरल तिकीट काढून स्लीपर कोचच्या डब्यातून प्रवास करत असाल तर नियम जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 फेब्रुवारी : रेल्वेमधून तुम्ही प्रवास केला असेल. कधीकधी असं होतं की आपल्याला तिकीट मिळत नाही मग जनरलचं तिकीट काढून आपण ट्रेनने प्रवास करतो. आता होळी आली आहे. शिमगा होळी निमित्ताने अनेक लोक आपल्या गावी जातात. अशावेळी तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुम्हाला हा नियम माहिती असायला हवा.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ट्रेनमधील रिकाम्या जागा भरण्यासाठी अनेक नियम केले आहेत. अनेक प्रवाशांना या नियमांची माहिती नसते आणि त्यामुळे एकतर ते त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत किंवा त्यांच्याकडून चुका होतात. जर तुम्ही नियमित रेल्वे प्रवास करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

तुम्ही जर जनरल तिकीट काढून स्लीपर कोचच्या डब्यातून प्रवास करत असाल तर तुम्हाला दंड लागणार नाही. तुम्हाला स्लीपर कोचमधून प्रवास करता येणार आहे. टीसी तुमच्याकडून रक्कम आकारू शकत नाही.

जनरल तिकीटाने स्लीपर कोचमधून प्रवास करता येतो का? नेमका काय आहे नियम

बऱ्याचवेळा असं होतं की काही जण तिकीट काढून येत नाही किंवा आयत्यावेळी रद्द होतं. अशा जागा रिकाम्या राहतात आणि त्यामुळे रेल्वेलाही याचा मोठा फटका बसतो. हा तोटा भरून काढण्यासाठी, रेल्वे लोकल आणि झोन स्तरावर अनेक नियम बनवते, जेणेकरून ट्रेनमध्ये उपलब्ध सीटचा जास्तीत जास्त वापर करता येईल. जनरल तिकिटावर स्लीपर कोचमधून प्रवास करण्याचा नियम आहे. प्रथमदर्शनी हे तुम्हाला विचित्र वाटेल. पण, भारतीय रेल्वे ही सुविधा देते. इथे जनरल तिकीट म्हणजे पूर्णपणे जनरल तिकीट. आम्ही तुम्हाला कोणत्याही गैरसमजाखाली ठेवत नाही आहोत.

First published:
top videos

    Tags: Coach, Indian railway, Sleeper, Ticket, Travel