IRCTC Food Price Hike: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महागाईचा फटका बसला आहे. रेल्वेतील खाण्यापिण्याच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. IRCTC ने प्रत्येक पँट्री कारमध्ये उपलब्ध पदार्थांच्या किमतीत वाढ केलीये. पूर्व मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतून जाणाऱ्या गाड्यांमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आयआरसीटीसीचे प्रादेशिक महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी सांगितले की, अन्नाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही सुधारले आहे, त्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ करण्यात आलीये. वाढ करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये रोटी, डाळ, डोसा, सँडविच अशा पदार्थांचा समावेश आहे.
रेल्वेत खाद्यपदार्थ महागले
IRCTC ने गाड्यांमधील प्रत्येक डिशच्या किमती वाढवल्या आहेत. पण दिलासा देणारी बातमी म्हणजे स्थानकांवर उपलब्ध खाद्यपदार्थांच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. IRCTC ने पूर्व मध्य रेल्वेवरून जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रत्येक डिशच्या किमती 2 ते 25 रुपयांनी वाढवल्या आहेत. वेगवेगळ्या वस्तूंच्या किमतीत वेगवेगळी वाढ करण्यात आलीये. IRCTC ने 70 वस्तूंची यादी जारी केली आहे, ज्यांच्या किमती बदलल्या आहेत.
समोसा 10 रुपयांना मिळणार
आता ट्रेनमध्ये समोस्यांसाठी 8 रुपयांऐवजी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एका सँडविचची किंमत 16 रुपये असेल. याशिवाय रोटी आता 10 रुपयांना मिळणार आहे.
कोणत्या पदार्थांच्या किंमती वाढल्या?
पदार्थ | जुन्या किंमती | नवीन किंमती |
---|---|---|
समोसा | 8 रुपये | 10 रुपये |
सँडविच | 15 रुपये | 25 रुपये |
बर्गर | 40 रुपये | 50 रुपये |
ढोकळा (100 ग्राम) | 20 रुपये | 30 रुपये |
ब्रेड पकोडा | 10 रुपये | 15 रुपये |
आलू वडा | 7 रुपये | 10 रुपये |
मसाला डोसा | 40 रुपये | 50 रुपये |
रोटी | 3 रुपये | 10 रुपये |