मराठी बातम्या /बातम्या /मनी /Sarkari Naukri 2021: पोस्टात नोकरीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, महाराष्ट्रात 1940 पदासांठी भरती

Sarkari Naukri 2021: पोस्टात नोकरीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, महाराष्ट्रात 1940 पदासांठी भरती

भारतीय पोस्ट खात्यानं (Indian Post Department) ग्रामीण भागातील पोस्ट सेवकांच्या (Gramin Dak Sevak) 4368 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 मे 2021 पर्यंत वाढवली आहे.

भारतीय पोस्ट खात्यानं (Indian Post Department) ग्रामीण भागातील पोस्ट सेवकांच्या (Gramin Dak Sevak) 4368 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 मे 2021 पर्यंत वाढवली आहे.

भारतीय पोस्ट खात्यानं (Indian Post Department) ग्रामीण भागातील पोस्ट सेवकांच्या (Gramin Dak Sevak) 4368 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 मे 2021 पर्यंत वाढवली आहे.

  नवी दिल्ली, 29 मे: भारतीय पोस्ट खात्यानं (Indian Post Department) ग्रामीण भागातील पोस्ट सेवकांच्या (Gramin Dak Sevak) 4368 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 मे 2021 पर्यंत वाढवली आहे. या आधी ही मुदत 26 मे 2021 होती. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप या पदासाठी अर्ज केलेला नाही, त्यांना आजही ही संधी आहे. ते पोस्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.appost.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदभरतीसाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार बिहार मंडळात (Bihar Circle) 1940 तर महाराष्ट्र मंडळात (Maharashtra Circle) 2428 रिक्त जागांवर भरती होईल.

  कोणतीही लेखी परीक्षा न देता केवळ दहावी उत्तीर्ण या पात्रतेवर सरकारी नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे. ग्रामीण भागातील अल्पशिक्षित मुलांसाठी ही सुवर्ण संधी असून अद्याप अर्ज केलेला नसल्यास मुदत वाढीमुळे त्यांना आणखी एक संधीही उपलब्ध झाली आहे. मोठ्या संख्येनं पदभरती होणार असल्यानं नोकरी मिळण्याची शक्यताही अधिक आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीत सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणारी कर्मचारी भरती दिलासादायक आहे.

  हे वाचा-PM Jan-Dhan Account: तुम्ही जन धन खाते उघडले असेल तर मिळेल 1.3 लाखांचा फायदा

  शैक्षणिक पात्रता

  या पदांवर भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवाराला इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं ज्ञान असणंही आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी अधिसूचना (Notification) वाचावी.

  अर्जापूर्वी अधिसूचना वाचा

  या पदांसाठी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करा. केवळ नियमांनुसार केलेला अर्ज वैध असेल. ऑनलाईन अर्जात कोणतीही चूक किंवा कमतरता आढळल्यास तो रद्द केला जाऊ शकतो.

  हे वाचा-जून महिन्यात कोणत्या दिवशी राहणार बँका बंद, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी

  वयोमर्यादा

  ग्रामीण पोस्ट सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय (Age) 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेत इतर मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त तीन वर्षे तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षे सवलत देण्यात आली आहे.

  निवड प्रक्रिया

  उमेदवारांची निवड लेखी परीक्षा न घेता गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

  महत्त्वाच्या तारखा

  ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 27 एप्रिल 2021

  अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 मे 2021

  अधिकृत वेबसाइट

  www.appost.in

  First published:

  Tags: Job, Job alert, Money