नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही एक्सप्रेस वे किती मोठा पाहिला असेल. 4 ते 6 लेनचा पण याहीपेक्षा मोठा एक्सप्रेस वे भारतामध्ये आहे. बसं आश्चर्य या गोष्टीचं वाटेल की या एक्सप्रेस वे वरून चक्क सायकलही जाऊ शकते. एवढा रुंद एक्सप्रेसवे कुठे आहे आणि नेमकं काय आहे वैशिष्ट्य जाणून घेऊया.
सध्या एक्सप्रेस वे बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. देशातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे दिल्ली ते मुंबई दरम्यान बांधला जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का देशातील सर्वात रुंद एक्सप्रेस वे कुठे आहे? दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात रुंद द्रुतगती मार्ग आहे. यात एकूण 14 लेन आहेत. यात 6 एक्सप्रेस लेन आहेत ज्या मध्यभागी आहेत आणि दोन्ही बाजूंना 4-4 लोकल लेन असणार आहेत.
हा प्रकल्प 2006 मध्ये मंजूर झाला आणि 2021 मध्ये तयार करण्यात आला आहे. पूर्वी दिल्लीहून मेरठला जाण्यासाठी अडीच तास लागायचे, हा एक्सप्रेस वे बनल्यानंतर हा वेळ ४५ मिनिटांवर आला आहे. दिल्लीत हा एक्स्प्रेस वे निजामुद्दीनजवळून सुरू होतो.
ES, NH रस्त्यावर दिसणाऱ्या या फलकांचा नेमका अर्थ काय?
या एक्स्प्रेस वेच्या मदतीने दिल्ली ते हरिद्वार आणि डेहराडूनचा प्रवासही अतिशय सुरळीत आणि कमी वेळेत पूर्ण होत आहे. या एक्सप्रेस वेवर सिग्नल नाही. त्याच्या दोन्ही बाजूला व्हर्टिकल गार्डन बसवण्यात आले आहेत. त्यावर कुतुबमिनार आणि अशोक स्तंभाची स्मारक चिन्हे आहेत.
दोन्ही आणि अडीच मीटरचे सायकल ट्रॅक देण्यात आल्याने त्यावरही सायकल ही चालवता येणार आहे. या एक्सप्रेस वेवर बसवलेले दिवे सौरऊर्जेवर चालणारे आहेत. ज्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यावर 10 इमर्जन्सी कॉल बूथ बसवण्यात आले आहेत. त्यावरून मेसेज मिळाल्यानंतर 10 मिनिटांत कंट्रोल रूमला हा मेसेज पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेल्मेट असेल तरी तुम्हाला भरावा लागणार 2 हजारांचा दंड, वाहतुकीचे बदलले नियम
द्रुतगती मार्गावर 24 छोटे आणि मोठे पूल, 10 उड्डाणपूल, 3 रेल्वे पूल, 95 अंडरपास आणि 15 भूमिगत पादचारी क्रॉसिंग आहेत. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहराच्या मधोमध जात असल्याने त्यावर दिव्यांची पुरेशी व्यवस्था करण्यासाठी 4500 दिवे बसविण्यात आले आहेत.
देशातील हा पहिला महामार्ग किंवा एक्सप्रेस वे आहे ज्यावर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. म्हणजेच टोल भरण्यासाठी वाहनांना येथे थांबण्याची गरज नाही.
8346 कोटी रुपये खर्चून बांधलेला दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे चार टप्प्यांत बांधण्यात आला. त्याची एकूण लांबी 82 किलोमीटर आहे. यापैकी 60 किमी द्रुतगती मार्ग आणि 20 किमी महामार्ग आहे. त्याचा पहिला टप्पा निजामुद्दीन ते यूपी गेट, दुसरा टप्पा यूपी गेट ते डासना, तिसरा टप्पा डासना ते हापूर आणि चौथा टप्पा डासना ते मेरठ आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Delhi latest news, Uttar pradesh