एक्सप्रेस वे यामध्ये लेनची संख्या जास्त असते. रस्ता एकदम सुसाट गाडी चालवण्यासारखा असतो यावर खूप जास्त सुरक्षा असते. स्पीडवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागोजागी कॅमेरे लावलेले असतात. MORTH द्वारे हे ऑपरेट केले जातात.
राष्ट्रीय महामार्ग : हे मुख्यत: जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणांना हायवेचा दर्जा दिला जातो. भारतातील राज्य आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये हे दिसतात. एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा राज्यात जोडलेले असतात. याची रुंदी 7 ते 15 मीटर लांब असते.
स्टेट हायवे : राज्यातील जिल्हा आणि प्रमुख शहरांना जोडणारा हा मार्ग असतो. हे आजूबाजूच्या राज्यांना देखील जोडतात. राज्यांच्या सीमारेषेवर देखील स्टेट हायवे आहेत. तुम्ही जर अशा ठिकाणहून प्रवास करत असाल तर तुम्हाला फलक पाहायला मिळतील.
जिल्हा रस्ते : जिल्हा मुख्यालयापासून ते शहरांना जोडलेले असतात. यासोबत स्टेट हायवेला देखील हे जोडलेले असतात. काही रस्ते तर राष्ट्रीय महामार्गांना देखील जोडण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, जिल्हा मुख्यालय याच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांचा यामध्ये समावेश असतो.
पंचायत किंवा ग्रामीण रस्ते: जे रस्ते कोणत्याही गावाला जिल्हा रस्त्यांशी जोडतात त्यांना पंचायत किंवा ग्रामीण रस्ते म्हणतात. या रस्त्यांवर फक्त हलकी वाहतूक सुरू असते. ग्रामीण भागाच्या विकासात हे रस्ते फार महत्त्वाची भूमिका बजावतात.