सगळीकडेच वाहतुकीचे नियम खूप कडक करण्यात आले आहेत. नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र इथे तर अजबच प्रकार आहे.
2/ 9
हेल्मेट घालून आणि नियम पाळूनही तुमचं 2000 रुपये चलन कापलं जातं. नेमकं कुठे आणि यामागचं काय कारण आहे समजून घेऊया.
3/ 9
तुम्ही जर कार किंवा बाईक घेऊन बाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची. तुम्हालाही भरावा लागू शकतो 2000 रुपयांचा दंड
4/ 9
वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस आणि अधिकारी अनेक नवीन नियम आणत आहेत. वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन वाहतूक नियमांचा अवलंब करण्यात येत आहे.
5/ 9
नुसतं डोक्यावर हेल्मेट घातलं मात्र ते व्यवस्थित लॉक केलं नसेल तर कलम 194D MVA नुसार 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
6/ 9
BIS नोंदणीकृत हेल्मेट असणं आवश्यक आहे. ते नसेल तरी तुमच्यावर कारवाई होईल आणि तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. एकूण हा दंड 2000 रुपये असू शकतो असंही सांगण्यात आलं आहे.
7/ 9
रस्ते वाहतूक विभागाने नुकतेच लहान मुलांना घेऊन जाताना पाळावे लागणाऱ्या अनेक सुरक्षेचे नियम आणले आहेत. प्रौढांनी हेल्मेट घालावे, तर मुलांनीही बेल्ट घालावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
8/ 9
बाईकचा वेग हा 40 किमी पेक्षा जास्त असेल तरी 1000 रुपये दंड भरावा लागेल अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय 3 महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाऊ शकतो.
9/ 9
तेलंगणा परिवहन विभागाने नुकताच वाहतूक चालनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. चलनावर डिस्काउंट ऑफर जाहीर केल्याचे आधीच माहीत आहे. आता चालान व्हॉट्सअॅपवरही उपलब्ध होणार आहेत. हैदराबाद वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.