नवी दिल्ली, 5 जानेवारी : भारतीय सराफा बाजारात आज 5 जानेवारी 2022 रोजी सोने दरात तेजी (Gold Price Today 5 January 2022) पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोने दरात 154 रुपयांची वाढ झाली. तर चांदीचा दर 352 रुपयांनी वधारला. काय आहे सोन्याचा दर? आज दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोने दर 154 रुपये वाढीसह 46,969 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 46,815 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. काय आहे चांदीचा भाव? आज चांदीचा दरही वधारला आहे. चांदीचा भाव 60 हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीचा दर 352 रुपयांच्या तेजीसह 60,725 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 60,373 रुपये प्रति किग्रॅ इतका होता.
SBI ग्राहकांना झटका! फेब्रुवारीपासून महागणार ही सेवा, द्यावे लागणार 20 रुपये+GST
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
तुमच्याकडेही असं PAN Card असेल तर भरावा लागेल 10 हजारांचा दंड, वाचा नियम
अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक App बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App द्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या App मध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या App च्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.