जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 5G नंतर आता आणखी एका क्षेत्रात भारताची आत्मनिर्भर बनण्याची तयारी

5G नंतर आता आणखी एका क्षेत्रात भारताची आत्मनिर्भर बनण्याची तयारी

PM मोदींनी लाँच केला रोजगार मेळावा

PM मोदींनी लाँच केला रोजगार मेळावा

भारतात डेटा सेंटर सुरू करण्यासाठी इंन्सेटिव्ह मिळणार आहेत. २० ते ३० टक्के इंसेंन्टीव्हच्या अनुषंगाने शिफारस केली जाऊ शकते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

असीम मनचंदा नवी दिल्ली : भारतात 1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G लाँच केलं आहे. एक नव्या क्रांतीच्या दिशेनं वाटलाच सुरू केली आहे. आता भारत डेटा सेंटरमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी तयारी करत आहे. भारतात डेटा केंद्रे सुरू करण्यासाठी कंपन्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून 20 ते 25 टक्के प्रोत्साहन मिळू शकतं. ट्राय एका आठवड्यात आपल्या शिफारसी जारी करेल. भारतात डेटा सेंटर सुरू करण्यासाठी इंन्सेटिव्ह मिळणार आहेत. २० ते ३० टक्के इंसेंन्टीव्हच्या अनुषंगाने शिफारस केली जाऊ शकते. भारतात डेटा सेंटर पार्क, डेटा सेंटर सेझ स्थापन करण्याबाबतही शिफारशी असतील. ट्रायने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याबाबत सल्लापत्र जारी केले होते. भारतातील सर्व्हर उत्पादनावरही प्रोत्साहन मिळेल. भारतातील 447 मेगावॅट डेटा सेंटर मार्केट आहे. 1.5 अब्ज डॉलरचं डेटा सेंटर मार्केट आहे. ते 2025 पर्यंत व्यवसाय 5 अब्ज डॉलर होईल असा विश्वास आहे. काय आहे डेटा सेंटर? डेटा सेंटर हे असं ठिकाण आहे जिथे कंपनीच्या आयटी हालचाली आणि उपकरणांसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. या सुविधांमध्ये डेटा स्टोरेज, प्रक्रिया आणि माहितीची देवाण घेवाण आणि कंपनीच्या सूचनांचं प्रोसेसिंग या गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात. हा एक प्रकारचा सर्व्हरच असतो. जिथून कंपनीचे संपूर्ण आयटी ऑपरेट केले जाते.

Whatsapp Updates : ‘या’ सरकारी बँकेकडून Whatsapp सर्व्हिस लाँच, पाहा तुम्हाला कसा होणार फायदा

ऑनलाइनच्या वाढत्या युगात, अशा डेटा सेंटर्सना मोठी मागणी आहे कारण काही ठिकाणी डेटा सुरक्षित ठेवणे देखील एक आव्हान आहे. नोएडा येथे बांधण्यात येणारा कॅम्पस हे आव्हान पेलण्यास मदत करेल. एसटी टेलिमीडिया सिंगापूर भारतात 112 डेटा सेंटर चालवते.

News18लोकमत
News18लोकमत

आयटी क्षेत्रात भारताचा मोठा वाटा आहे. जगातील सर्व मोठ्या कंपन्या येथे त्यांची केंद्रे चालवतात. ऑनलाइन आणि कंम्प्युटरवर आधारित उद्योग भारतात झपाट्याने वाढत आहेत. हे पाहता डेटा साठवणे हे महत्त्वाचे काम आहे.

Amazonसोबत फक्त 4 तास काम करा, दरमहा होईल 60,000 रुपयांपर्यंत कमाई

डेटा सेंटर कॅम्पसच्या निर्मितीमुळे उद्योग किंवा आयटी कंपन्यांना फायदा होईल आणि ते स्टोरेज सुविधा घेऊ शकतील. येत्या काळात याला आणखी गती मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात