मुंबई, 12 जून : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हची मे महिन्यातील महागाईची आकडेवारी आणि व्याजदरांबाबतचा निर्णय या आठवड्यात शेअर बाजारांची दिशा ठरवेल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. याशिवाय विदेशी फंड हाऊसचा कल, रुपयाची अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमती हेही बाजाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहेत. गेल्या आठवड्यात, बीएसई 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,465.79 अंकांनी किंवा 2.62 टक्क्यांनी घसरला. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लि. चे रिसर्च हेड संतोष मीणा यांनी म्हटलं की, सर्वांच्या नजरा फेडरल रिझर्व्हच्या फेडरल फ्री मार्केट कमिटी (FOMC) 15 जूनच्या निर्णयाकडे असतील. महागाईच्या दरम्यान व्याजदरातही वाढ होण्याची अपेक्षा बाजाराला आहे. बँक ऑफ जपान देखील 17 जून रोजी आपला आर्थिक आढावा सादर करेल. गृहकर्जाचे व्याजदर वाढल्याने घरखर्चाचं बजेट कोलमडलं? EMI कमी करण्यासाठी काय करु शकता? परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरुच मीना यांनी पुढे म्हटलं की, जागतिक शेअर बाजारातील विक्रीच्या काळात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा (FII) दृष्टिकोन काय राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. FII गेल्या सलग आठ महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत. देशांतर्गत आघाडीवर, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) डेटा 13 जून रोजी आणि घाऊक किंमत निर्देशांक (WPI) महागाईचा डेटा 14 जून रोजी येईल. याशिवाय रुपया आणि कच्च्या तेलाच्या चढउतारांवरही लक्ष असेल. Bank of Baroda E-Auction: स्वस्त घर खरेदीची संधी, ‘या’ दिवशी लिलावात सहभागी व्हा बाजारातील अस्थिरता कायम राहील रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले की, या आठवड्यात आगामी डेटा आणि महत्त्वाच्या घडामोडींमुळे बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील महागाईने 40 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर IIP चे आकडे आले. CPI महागाईचा डेटा 13 जून आणि WPI महागाईचा डेटा 14 जून रोजी येणार आहे. जागतिक आघाडीवर, 15 जून रोजी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या बैठकीचे निकाल येतील. विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक चलनवाढीमुळे बाजारावर प्रचंड दबाव आहे. अशा स्थितीत केंद्रीय बँकांकडून पावले उचलणे अपेक्षित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.