मुंबई, 7 फेब्रुवारी : आर्थिक वर्ष 2021-22 संपायला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. जर तुम्ही आतापर्यंत जास्तीत जास्त कर वाचवण्याचे सर्व मार्ग अवलंबले नसतील तर ते लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. वेळ जास्त असेल तर सर्व पर्यायांचा विचार करुन योग्य निर्णय घेण्यास आणखी मदत होईल. तुम्हीही अजूनपर्यंत काहीच केलं नसेल तर चला आता करा. आयकराच्या कलम 80C अंतर्गत तुम्ही 1.50 लाखावरील कर वाचवण्याचे मार्ग जाणून घेऊया. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF ही कर वाचवण्यासाठी सरकारची सर्वोत्तम गुंतवणूक योजना मानली जाते. यामध्ये तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्यावर सध्या वार्षिक 7.10 टक्के व्याज मिळते. राष्ट्रीय पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही सरकारद्वारे चालवली जाणारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात आणि कलम 80CCD (1B) अंतर्गत अतिरिक्त 50 हजार रुपये गुंतवले जाऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजना जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तिच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक करू शकता. वार्षिक व्याज दर 7.6% आहे. यावर कर कपातीचाही फायदा आहे. PF Account वर 1 एप्रिलपासून कर भरावा लागणार, तुमच्यावर काय परिणाम होईल? ज्येष्ठ नागरिक बचत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या बचत योजनेत बँका आणि पोस्ट ऑफिसमधून गुंतवणूक करता येते. त्यावर वार्षिक 7.4% व्याज मिळते. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीला कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते. विमा उत्पादने युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) आणि पारंपारिक विमा योजनांना प्रीमियमवर कर सूट मिळते. परंतु, लक्षात ठेवा की युलिप प्रीमियमची रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास कर सूट उपलब्ध नाही. कर बचत मुदत ठेव टॅक्स सेव्हिंग एफडीद्वारे कर सूट मिळू शकते. परंतु, हा फार चांगला पर्याय नाही कारण तो वार्षिक 5% पेक्षा कमी परतावा देईल आणि त्याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. Share Market Update : शेअर बाजारातील आजच्या पडझडीचं कारण काय? इक्विटी लिंक्ड बचत योजना ही इक्विटी म्युच्युअल फंडाची योजना आहे. यामध्ये 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक उपलब्ध आहे. वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचे रिटर्न करमुक्त आहेत आणि लॉक-इन कालावधी देखील 3 वर्षांचा सर्वात कमी आहे. इतर काही पर्याय: शिक्षण शुल्क, घराच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. 80C व्यतिरिक्त हे कर लाभ घरभाडे भत्ता, रजा प्रवास भत्ता, गृहकर्जाचे व्याज आणि मुलांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजावर कर सवलत उपलब्ध आहे. कलम 80G अंतर्गत देणग्या आणि कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्यासाठी प्रीमियम देखील कर लाभ मिळतात. गृहकर्जाच्या व्याजावर सूट मर्यादा 2 लाख रुपये आहे आणि शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर कर सूट मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्ही भरलेल्या व्याजाची संपूर्ण माफी तुम्हाला मिळेल. तुम्ही मेट्रो सिटी (50%) किंवा नॉन-मेट्रो सिटी (40%) मध्ये राहता यावर घरभाडे भत्त्यावरील कर सूट मोजली जाते. कोणत्याही परिस्थितीत HRA पेक्षा जास्त सूट मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.