Home /News /money /

Gold Price Today: 10 ग्रॅम सोने दरात आज घसरण, पाहा काय आहे लेटेस्ट रेट

Gold Price Today: 10 ग्रॅम सोने दरात आज घसरण, पाहा काय आहे लेटेस्ट रेट

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज डिसेंबर डिलीव्हरी सोन्याच्या दरात 0.04 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.16 टक्क्यांची घसरण झाली आहे.

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात सोने-चांदी दरात (Gold Silver Price Today) चढ-उतार सुरू आहेत. अशात तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज डिसेंबर डिलीव्हरी सोन्याच्या दरात 0.04 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.16 टक्क्यांची घसरण झाली आहे. काय आहे सोने-चांदी भाव - ऑक्टोबर डिलीव्हरी गोल्डचा दर आज 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदीचा दर 0.16 टक्क्यांनी घसरला आहे. आज एक किलो चांदीचा भाव 64,774 रुपये आहे. मागील वर्षी 2020 मध्ये याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होता. आज सोनं ऑगस्ट वायदा भाव 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅम लेवलवर आहे. 8 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या किंमतीत सोमवारी दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम 8 रुपयांची काहीशी घट नोंदवण्यात आली.

    आता EMI वरही काढता येणार विमानाचं तिकीट, Spicejet ची खास सुविधा

    सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात. सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या