नवी दिल्ली, 19 जून : घरात जास्त कॅश ठेवल्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि ईडीची रेड पडते. याविषयी तर तुम्ही ऐकलं असेलच. आपण बातम्यांमध्ये अशा घटनांविषयी अनेकदा वाचत आणि ऐकत असतो. अशा वेळी तुमच्या मनातही प्रश्न निर्माण होत असेल की, एखाद्या व्यक्तीला किती कॅश घरात ठेवण्याची परवानगी असते? तसंच एखाद्याच्या घरात जास्त कॅश मिळाली तर त्याच्याविरोधात काय कारवाई केली जाऊ शकते. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.
इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार घरात कॅश रक्कम ठेवण्यावर लिमिट नाही. तुम्हाला हवी तेवढी कॅश रक्कम तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता. मात्र, तपास यंत्रणेने त्याला कधी पकडले तर तुम्हाला त्याचा वैध स्रोत सांगावा लागेल. जर तुम्ही ते पैसे कायदेशीररित्या कमावले असतील तर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. म्हणजेच घरात तुम्ही कितीही कॅश ठेवू शकता. फक्त त्याचा सोर्स काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तसंच कागदपत्र देखील दाखवावी लागतील. इन्कम टॅक्स भरणे आवश्यक तुम्ही घरी मोठ्या प्रमाणात कॅश ठेवत असाल, तर तुमच्याकडे त्याचा वैध सोर्स तसेच त्याच्याशी संबंधित कागदपत्रे असणे गरजेचे आहे. उत्पन्नानुसार तुमचा इन्कम टॅक्सही भरलेला पाहिजे. जास्तीची कॅश पकडल्यानंतर तुम्ही तपास यंत्रणेसमोर हे पुरावे सादर केले तर तुमच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. तुम्हाला या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे माहिती नसेल तर तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. CIBIL स्कोअर सुधारायचाय? हे अॅप्स करतील मदत, प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये आहेत उपलब्ध! वैध सोर्स न सांगितल्यास भरावा लागेल दंड घरात जास्त कॅश पकडली गेल्यावर तुम्ही तपास यंत्रणेला त्याचा कायदेशीर सोर्स सांगितला नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. यासाठी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या घरातून जप्त केलेल्या रोख रकमेच्या 137 टक्के इतका दंड आकारतो. म्हणजेच, तुम्हाला तुमच्या घरातून कॅश वसूल केलेल्या रकमेपेक्षा 37% जास्त पैसे द्यावे लागतील. नोकरदार वर्गासाठी आला आयटीआर फॉर्म, नवं की जुनं कोणतं टॅक्स रिजीम बेस्ट? कॅश व्यवहारात या गोष्टी ठेवा लक्षात तुम्ही कॅशने मोठे व्यवहार करता, तेव्हा तुम्हाला त्याचे नियम देखील माहित असावेत. तुम्हाला एकावेळी बँकेत 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी पॅन कार्ड दाखवावे लागेल. त्याचबरोबर कोणतीही खरेदी करताना 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम कॅश देता येणार नाही. यासाठी तुम्हाला पॅन आणि आधार देखील दाखवावा लागेल. याशिवाय, जर तुम्ही एका वर्षात तुमच्या बँक अकाउंटमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश रक्कम जमा केली, तर तुम्हाला बँकेत पॅन आणि आधार दाखवावा लागेल.