मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करुन कमावू शकता 50 लाख रुपये; जाणून घ्या काय आहे योजना

दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करुन कमावू शकता 50 लाख रुपये; जाणून घ्या काय आहे योजना

योग्यरित्या गुंतवणूक केल्यास, दररोज 50 रुपये जमा करुन काही वर्षात तब्बल 50 लाख रुपयांचा फंड तयार करता येऊ शकतो. यासाठी म्युचअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो. म्युचअल फंडमध्ये (Mutual fund) कमी गुंतवणुकीत चांगले रिटर्न्स मिळवता येऊ शकतात.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 2 मे: जर तुम्ही बचतीची योजना आखत असाल, तर कमी पैशांत मोठी गुंतवणूक करता येऊ शकते. यासाठी योग्य ठिकाणी बचत करणं, तशी योजना आखणं गरजेचं (Investment Planning) आहे. योग्यरित्या गुंतवणूक केल्यास, दररोज 50 रुपये जमा करुन काही वर्षात तब्बल 50 लाख रुपयांचा फंड तयार करता येऊ शकतो. यासाठी म्युचअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो. म्युचअल फंडमध्ये (Mutual fund) कमी गुंतवणुकीत चांगले रिटर्न्स मिळवता येऊ शकतात. काय आहे जाणकारांचं म्हणणं? जाणकारांचं असं म्हणणं आहे, की अशा ठिकाणी गुंतवणूक करावी, जिथे चांगले रिटर्न्स मिळतील. यासाठी म्युचअल फंड अतिशय चांगला पर्याय आहे. एफडी (FD) किंवा पोस्ट ऑफिसच्या (Post Office Savings scheme) कोणत्याही स्किममध्ये गुंतवणूक केल्यास, 7-8 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स मिळत नाहीत. परंतु म्युचअल फंडमध्ये वार्षिक 12-15 टक्के रिटर्न्स सहजपणे मिळतात. त्यामुळे गुंतवणुकीचा हा पर्याय एक मोठा फंड, मोठी रक्कम तयार करण्यास मदत करू शकतो. SIP द्वारे गुंतवणूक - 50 लाख रुपयांचा फंड तयार करण्यासाठी SIP द्वारे गुंतवणूक करता येऊ शकते. SIP अर्थात सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन, जिथे तुम्ही दर महिना काही रक्कम गुंतवू शकता. फ्रँकलिन टेम्पलटन ऑफ इंडिया वेबसाईटवर एक कॅल्कुलेटर देण्यात आलं आहे. त्यानुसार, जर कोणी म्युचअल फंड स्किममध्ये दर महिना 1000 रुपयांची गुंतवणूक करत असेल, तर 20 वर्षांनंतर त्याच्याकडे 20 लाख रुपयांची मोठी रक्कम तयार होईल. येथे अंदाजे 12 टक्के रिटर्न मानलं गेलं आहे.

  (वाचा - PPF Scheme:रोज 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 15 लाख,जाणून घ्या काय आहे योजना)

  जर कोणी दर महिन्याला 500 रुपये गुंतवणूक केली, तर 20 वर्षांनंतर त्या व्यक्तीकडे जवळपास 5 लाख रुपयांचा फंड तयार होईल. जर 30 वर्षांपर्यंत दर महिन्याला 500-500 रुपये जमा केल्यास, 17.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम तयार होईल. जितके वर्ष गुंतवणूक केली जाईल, तितके वर्ष कम्पाउंडिंगचा फायदा मिळेल. कसे मिळतील 50 लाख - 50 लाख रुपयांचा फंड तयार करायचा असल्यास, दर महिन्याला 1500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 1500 रुपये प्रति महिना गुंतवणूक म्हणजे, दिवसाला 50 रुपयांची बचत. कॅल्कुलेटरनुसार, अंदाजे 12 टक्के रिटर्ननुसार, जर दर महिन्याला 1500-1500 रुपये जमा केले, तर 30 वर्षांनंतर तुमच्याजवळ जवळपास 53 लाख रुपयांचा फंड तयार असेल.

  (वाचा - Mutual Fund SIP: जाणून घ्या म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे)

  या गोष्टीं लक्षात ठेवा - गुंतवणूक सल्लागारांचं असं म्हणणं आहे, की जर तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात करत असाल, तर त्या दिवसाची वाट पाहू नका. ज्यावेळी पैसे शिल्लक असतील, त्यावेळी लगेच गुंतवणूक सुरू करा. परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे, ही गुंतवणूक अतिशय शिस्तीत केली पाहिजे. म्हणजे वेळेवर, ठरल्याप्रमाणे गुंतवणूक करावी लागेल किंवा वाढवावी लागेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Investment, Money, Savings and investments

  पुढील बातम्या