• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Mutual Fund SIP म्हणजे काय? पाहा काय आहेत त्याचे फायदे

Mutual Fund SIP म्हणजे काय? पाहा काय आहेत त्याचे फायदे

जून 2020 पासून एसआयपीमार्फत होणारी गुंतवणूक मंदावली होती. मात्र, मार्च महिन्यात यातील गुंतवणुकीत चांगलीच वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 एप्रिल: अलिकडच्या काळात म्युच्युअल फंड(Mutual Fund)मधील गुंतवणूक विशेषतः मासिक तत्वावर (Monthly Basis) करण्यात येणारी गुंतवणूक अर्थात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ही पध्दत लोकप्रिय झाली आहे. जून 2020 पासून एसआयपीमार्फत होणारी गुंतवणूक मंदावली होती. मात्र, मार्च महिन्यात यातील गुंतवणुकीत चांगलीच वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियानं (AMFI) दिलेल्या माहितीनुसार, एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडात गेल्या महिन्यात तब्बल 9 हजार 182 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या आठवड्यात, मनी कंट्रोलच्या सिंपली सेव्ह, या पॉडकास्टवर झालेल्या कार्यक्रमात मुंबईतील मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागार (Financial Planner) पारुल माहेश्वरी (Parul Maheshwari) यांनी एसआयपीच्या अनेक अज्ञात पैलूंबद्दल आणि गुंतवणुकदार याद्वारे कसा फायदा करून घेऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती दिली. एसआयपी सुरू करण्यासाठी श्रीमंत असण्याची आवश्यकता नाही: म्युच्युअल फंडात एक रकमी (Lumpsum)गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी 5000 रुपयांची आवश्यकता असते. एसआयपी सुरू करायची असेल तर 500 रुपयांपासून करता येते. काही फंड हाउसेस 100 रुपयांनी एसआयपी सुरू करण्याची परवानगी देतात. एसआयपी न थांबवता रक्कम काढण्याची सुविधा : म्युच्युअल फंड योजना ओपन-एन्डेड असेल, तर आपण त्यामधून कधीही पैसे काढू शकता. एसआयपी सुरू ठेवून देखील तुम्ही जमा शिल्लकीतील काही रक्कम काढू शकता. फंड हाऊसेस पैसे काढण्यासाठी फर्स्ट इन फर्स्ट आऊट (FIFO) यापद्धतीचा अवलंब करतात. अल्प-मुदतीसाठी भांडवली नफ्यावर कर भरावा लागतो, हे मात्र लक्षात घ्यावे लागेल. वर्षाच्या आधी रक्कम काढल्यास 15 टक्के कर भरावा लागतो. वाचा : तुम्ही देखील LIC policy काढली असेल तर सावध व्हा! 'या' कारणामुळे आहे तुमचे पैसे बुडण्याची भीती गेल्यावर्षी कोविड-19मुळे (Covid 19 Pandemic) बर्‍याच लोकांच्या उत्पन्नात घट झाली. काहींनी नोकर्‍या गमावल्या, अशा वेळी काही महिन्यांकरिता एसआयपी स्थगित करता येते. तुमच्याकडे पैसे आले की तुम्ही एसआयपी पुन्हा सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला एक साधा फॉर्म भरावा लागेल. त्यात विविध पर्याय असतात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 3 ते 6 महिने एसआयपी थांबवू शकता. फंड हाऊसेस (Fund Houses) जास्तीत जास्त सहा महिने एसआयपी थांबवण्याची परवानगी देतात. ज्या फंडात एसआयपी चालू आहे त्याच फंडात तुम्ही एक रकमी गुंतवणूक देखील करू शकता. एलएसएस एसआयपीसाठी लॉक इन सुविधा : एक रक्कमी गुंतवणूकी प्रमाणे एसआयपीवर देखील भांडवली लाभ कर आणि लॉक-इनचे(Lock-In)नियम लागू होतात. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ELSS) करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीला तीन वर्षांची मुदत अनिवार्य असते. त्याआधी त्यातील गुंतवणूक काढून घेता येत नाही. एसआयपीला देखील हा नियम लागू होतो. उदाहरणार्थ, तुम्ही या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2021 पासून ईएलएसएस फंडामध्ये एसआयपी सुरू केल्यास एप्रिल 2024 मध्ये तिचा लॉक-इन कालावधी संपेल नंतरच ती गुंतवणूक काढता येईल. मे 2021पासून सुरू होणारी एसआयपी मे 2024 मध्ये लॉक-इनमधून बाहेर पडेल,’ असं माहेश्वरी म्हणाल्या. डेटफंडांमध्ये एसआयपी शक्य आहे: एसआयपी म्हटलं की सर्वांना इक्विटी फंड (Equity Funds) आठवतात; पण तुम्ही एसआयपी मार्फत डेट फंडात देखील (Debt Fund) गुंतवणूक करू शकता, अशी माहिती माहेश्वरी यांनी दिली. गुंतवणूकदारांना याबाबत माहिती नसल्यामुळे ते सहसा अचानक येणाऱ्या संकटासाठी तरतूद करण्याकरता मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतात. लिक्विड फंडामध्ये (Liquid Fund) एसआयपीद्वारे गुंतवणूक करून देखील आकस्मिक खर्चाची तरतूद करता येते. गोल्ड म्युच्युअल फंडात देखील तुम्हाला एसआयपी गुंतवणूक करता येते, असंही माहेश्वरी यांनी सांगितलं. एसआयपी रद्द केली तरी दरमहा हप्ता भरावा लागतो का?: काही वेळा एसआयपी रद्द करण्यास सुमारे 15 ते 30 दिवस लागतात. त्यामुळे पुढचा हप्ता देखील जातो. कारण कोणत्याही एसआयपीचे पैसे बँकेला देण्यात आलेल्या सुचनेद्वारे खात्यातून फंडात जमा होतात. त्यामुळे बँकेला दिलेली ही सूचना रद्द करण्यासाठी बँक (Bank) काही कालावधी घेते. तुमच्या एसआयपी हप्त्याची तारीख महिन्याच्या सुरुवातीचीच असेल आणि तुम्ही आधीच्या महिन्याच्या 20 तारखेला एसआयपी रद्द केली, तर तुमचा पुढचा हप्ता देखील खात्यातून फंडात जमा होईल, अशी माहितीही माहेश्वरी यांनी दिली.
  First published: