मराठी बातम्या /बातम्या /मनी /रुपयाच्या घसरणीने चिंता वाढली; मात्र देशातील 'या' राज्याला होऊ शकतो फायदा

रुपयाच्या घसरणीने चिंता वाढली; मात्र देशातील 'या' राज्याला होऊ शकतो फायदा

कोरोना महामारीपूर्वी भारतात परदेशातून येणारा 19 टक्के पैसा एकट्या केरळमध्ये येत होता. 2021 मध्ये परदेशातून 87 अब्ज डॉलर भारतात आले. त्याच वेळी, 2020 मध्ये हा आकडा 83 अब्ज डॉलर होता.

कोरोना महामारीपूर्वी भारतात परदेशातून येणारा 19 टक्के पैसा एकट्या केरळमध्ये येत होता. 2021 मध्ये परदेशातून 87 अब्ज डॉलर भारतात आले. त्याच वेळी, 2020 मध्ये हा आकडा 83 अब्ज डॉलर होता.

कोरोना महामारीपूर्वी भारतात परदेशातून येणारा 19 टक्के पैसा एकट्या केरळमध्ये येत होता. 2021 मध्ये परदेशातून 87 अब्ज डॉलर भारतात आले. त्याच वेळी, 2020 मध्ये हा आकडा 83 अब्ज डॉलर होता.

मुंबई, 14 जुलै : भारतच नव्हे तर जवळपास सर्वच देश महागाईने त्रस्त आहे. याचा परिणाम देशांच्या अर्थव्यवस्थांवर होत आहे. अमेरिकन डॉलर आणि इतर काही पाश्चिमात्य देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचा भारताच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. परंतु केरळला याचा फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे परदेशात काम करणारे केरळचे लोक त्यांच्या मूळ राज्यात जास्त पैसे पाठवतील. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था सुधारू शकते. केरळमधील सुमारे 34 लाख लोक परदेशात काम करतात. यातील 90 टक्के लोक आखाती देशांमध्ये राहतात.

कोरोना महामारीपूर्वी भारतात परदेशातून येणारा 19 टक्के पैसा एकट्या केरळमध्ये येत होता. 2021 मध्ये परदेशातून 87 अब्ज डॉलर भारतात आले. त्याच वेळी, 2020 मध्ये हा आकडा 83 अब्ज डॉलर होता. केंद्र सरकारने आता अनिवासी भारतीयांना सरकारला न कळवता भारतात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे परदेशातून देशात येणारा पैसाही वाढेल. याचा सर्वाधिक फायदा केरळलाही होणार आहे.

दही-लस्सीसह या वस्तूंच्या किमती 18 जुलैपासून वाढणार, काही वस्तू स्वस्तही होणार; पाहा लिस्ट

केरळचा रेमिटन्समध्ये वाढ

मनीकंट्रोलच्या एका अहवालानुसार, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक पातळीवर घसरल्यानंतर केरळचे रेमिटन्स (परदेशातून येणारे पैसे) पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. येत्या काही महिन्यांत याला आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे. लुलू फायनान्शिअल होल्डिंग्जचे सीनियर एक्झिक्युटीव्ह यांनी सांगितले की, आखाती देशांमध्ये सुट्टीचा हंगाम आणि रुपया कमकुवत झाल्यामुळे केरळला परदेशातून येणारे पैसे वाढतील.

Inflation: महागाईचा फटका सर्वसामान्यांना कसा बसतोय? नाश्ता ते प्रवास सगळंच महाग

12 जुलै रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 79.60 वर बंद झाला. केरळच्या बँकांमध्ये एनआरआय खात्यांमध्ये पैसे जमा करण्याचा वेग मंदावला आहे. याचे कारण म्हणजे लोक परदेशातून आलेला पैसा बँकांमध्ये ठेवण्यापेक्षा खर्च करण्यास प्राधान्य देत आहेत. याचे एक कारण कमी व्याजदर हे देखील आहे. व्याजदर वाढल्यास हा कल उलटू शकतो.

First published:

Tags: Economy, Rupee