नवी दिल्ली, 14 जुलै : येत्या 18 जुलैनंतर महागाईत आणखी भर पडणार आहे. कारण काही वस्तू आणखी महाग होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST कौन्सिलच्या 47 व्या बैठकीत असे काही निर्णय घेण्यात आले ज्यामुळे सर्वसामान्यांवर खर्चाचा बोजा वाढणार आहे. कौन्सिलच्या बैठकीत अशा अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यावर आतापर्यंत कर आकारला गेला नव्हता. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले होते की, वस्तूंवरील जीएसटीचे नवे दर 18 जुलैपासून लागू होतील. 18 जुलैनंतर जीएसटीचे नवे दर लागू झाल्यानंतर कोणती वस्तू स्वस्त होईल आणि कोणती महाग होईल हे जाणून घेऊया. Inflation: महागाईचा फटका सर्वसामान्यांना कसा बसतोय? नाश्ता ते प्रवास सगळंच महाग कोणत्या वस्तू महागणार? 18 जुलैपासून टेट्रा पॅक दही, लस्सी आणि बटर मिल्कवर 5% दराने जीएसटी लागणार आहे. आतापर्यंत यावर जीएसटी आकारला जात नव्हता. तुम्ही नवीन चेकबुक घेतल्यास, त्यावर 18 जुलैपासून 18% जीएसटी लागू होईल. 5000 रुपयांपेक्षा जास्त भाडे (नॉन-ICU) असलेल्या रुग्णालयातील रुम्सना आता 5% कर भरावा लागेल. जीएसटी कौन्सिलने दररोज 1000 रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेल रुम्सवर 12% जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे, जे अजूनही जीएसटीच्या कक्षेबाहेर होते. एलईडी लाईट्स, एलईडी दिव्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. Petrol Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरुच, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या की कमी झाल्या? ब्लेड, कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर आणि केक-सर्व्हर्स इत्यादींवर आता 12 टक्क्यांऐवजी 18 टक्के दराने जीएसटी लागू होईल. या वस्तू स्वस्तात मिळतील सुट्टीच्या दिवसात रोपवे टूर करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रोपवेद्वारे प्रवासी आणि वस्तूंच्या वाहतुकीवर जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला आहे. स्प्लिंट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसिस, बॉडी इम्प्लांट्स, इंट्राओक्युलर लेन्स इत्यादींवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलने ज्या ऑपरेटर्ससाठी इंधनाच्या किमतीचा समावेश केला आहे त्यांच्यासाठी मालवाहतुकीच्या भाड्यांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आणला आहे. संरक्षण दलांसाठी आयात केलेल्या विशेष वस्तूंना IGST मधून सूट देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.