नवी दिल्ली, 9 एप्रिल: तुम्ही नोकरी करता? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या वर्षाच्या जुलै महिन्यापासून तुमच्या सॅलरी स्ट्रक्टर **(employees salary structure)**मध्ये बदल होऊ शकतात. कामगार मंत्रालया **(Ministry of Labour)**ने येत्या दोन महिन्यांत राज्यांना लेबर कोड्स संबंधित नियम (Labour codes rules) अंतिम करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आता जुलै महिन्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. तसेच चारही कायद्यांची अधिसूचना एकाच वेळी दिली जाईल. हे पण पाहा : 12 लाखात सुरू करा ऑनलाइन पेट्रोल-डिझेलचा व्यवसाय; काही वर्षातच व्हाल 100 कोटींचे मालक जुलैपासून नवीन सॅलरी स्ट्रक्चर जुलैपासून नवीन कामगार कायदे लागू होण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयाने नवीन मुदत निश्चित केली आहे. इंडस्ट्री असलेल्या राज्यांसाठी जून महिन्याची डेडलाइन निश्चित केली असून दोन महिन्यांत नियम ठरवायचे आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यापासूनच नवीन कायदे लागू केले जाणार होते परंतु उद्योजकांनी जूनपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे. नवीन कायद्यांनंतर पगाराची रचना बदलू शकते. हे पण पाहा : Corona vaccine घेतल्यानंतर मोदी सरकार देणार दरमाह 5000 रुपये; तुम्हाला करावं लागेल फक्त एक काम काय बदल होणार? पगारामध्ये भत्ता 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही. नवीन कायद्यानुसार बेसिक सॅलरी वाढवण्यात येईल आणि युनिव्हर्सल मिनिमम वेज लागू करण्यात येईल. विम्याचा मार्ग सर्वांसाठी खुला होईल. हे चार कायदे एकाच वेळी लागू होतील. वेज कोड, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि OSH शी संबंधित कायदे मंजूर झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.