जाहिरात
मराठी बातम्या / मनी / या 3 सरकारी बँकेच्या ग्राहकांनी लक्ष द्या! बदलणार तुमच्यावर थेट परिणाम करणारे नियम, वाचा सविस्तर

या 3 सरकारी बँकेच्या ग्राहकांनी लक्ष द्या! बदलणार तुमच्यावर थेट परिणाम करणारे नियम, वाचा सविस्तर

या 3 सरकारी बँकेच्या ग्राहकांनी लक्ष द्या! बदलणार तुमच्यावर थेट परिणाम करणारे नियम, वाचा सविस्तर

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), कॅनरा बँक (Canara Bank) आणि सिंडिकेट बँकेचे (Syndicate Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 मे: जर तुम्ही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), कॅनरा बँक (Canara Bank) आणि सिंडिकेट बँकेचे (Syndicate Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी चेक पेमेंट संबंधित नियमात बदल होणार आहे. तर कॅनरा आणि सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांसाठी आयएफएससी कोड (IFSC Code) संबंधित बदल होणार आहेत. वाचा सविस्तर 1 जून पासून चेक पेमेंट संबंधित नियम बदलणार बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी 1 जून 2021 पासून  पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन (Positive Pay Confirmation) अनिवार्य केले आहे. ग्राहक फसवणुकीची शिकार होऊ नयेत हा यामागचा मानस आहे.  पॉझिटिव्ह पे प्रणाली एक प्रकारे फ्रॉड शोधणारं टूल आहे. या सिस्टिम अंतर्गत ग्राहकांने चेक जारी केल्यानंतर बँकेला संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. चेक पेमेंट करण्याआधी बँक ही माहिती क्रॉस चेक करेल. जर यामध्ये कोणताही गोंधळ आढळून आल्यास बँक तो चेक रिजेक्ट करेल. हे वाचा- SBI च्या या सूचनांकडे दूर्लक्ष करू नका! अन्यथा येईल कंगाल होण्याची वेळ काय आहे बँकेचं म्हणणं? BoB च्या मते, त्या ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टिम अंतर्गत चेक डिटेल्स रिकन्फर्म करावं लागेल जेव्हा ते 2 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा बँक चेक जारी करतील. हा नियम 1 जून पासून लागू होणार आहे. हे वाचा- Smartphoneचा पॅटर्न लॉक पासवर्ड विसरलात? पाहा Unlock करण्यासाठी सोप्या स्टेप्स 1 जुलैपासून बदलणार IFSC कोड कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलैपासून आयएफएससी कोड बदलणार आहे. सिंडिकेट बँकेने ग्राहकांना नवीन आयएफएससी कोड 30 जूनपर्यंत अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. नवीन आयएफएससी कोड जाणून घेण्यासाठी तुम्हाला कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर जावे लागेल. कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण झाले होते. तर बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक आणि विजया बँकेचे विलिनीकरण झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात