जग 2008-09 पेक्षाही भयावह मंदीच्या खायीत लोटलं जाणार, IMFच्या संचालकांचा इशारा

जग 2008-09 पेक्षाही भयावह मंदीच्या खायीत लोटलं जाणार,  IMFच्या संचालकांचा इशारा

IMF व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला गंभीर आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मार्च :  आंतराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी सोमवारी जी-20 देशांच्या अर्थ मंत्र्यांबरोबर आणि केंद्रीय बँकांच्या प्रमुखांशी चर्चा केली. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव आणि त्याचे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम याबाबत ही चर्चा झाली. IMF व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला गंभीर आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावेळी येणारी मंदी ही 2009 मध्ये आलेल्या मंदीपेक्षाही भयंकर स्वरूपाची असणार आहे. किती लवकर आपण कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचं नियंत्रण करतो, यावरच संपूर्ण गोष्टी अवलंबून आहेत.

(हे वाचा-पेट्रोल-डिझेल 8 रुपयांनी महागणार, जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा प्लान)

जॉर्जिवा यांनी सांगितलं की छोटी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांच्या मदतीसाठी विकसनशील अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ‘आयएमएफ’ची 1 ट्रिलियन डॉलर रुपये उधार देण्याची क्षमता आहे आणि एवढी मदत करण्याची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली आहे.

(हे वाचा-कोरोनामुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढण्याची दाट शक्यता)

जगभरातील कोट्यवधी लोकांना बंदचा सामना करावा लागत आहे. जॉर्जिवा यांनी सर्व अर्थमंत्र्यांना इशारा दिला आहे की, 2020 साठीचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटापेक्षाही भयावह मंदीचा सामना येणाऱ्या काळात करावा लागणार आहे. 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट आले होते, त्यामुळे 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये 0.6 टक्क्यांची घसरण झाली होती. पण त्यावेळी भारत आणि चीनसारख्या विकसनशील देशांमधील बाजारात तेजी आली होती. कोरोनामुळे आर्थिक नुकसान तर होणारच आहे, पण त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. काही फोरकास्टर्सच्या मते 1.5 टक्क्यांनी मंदी येऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2020 12:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading