मुंबई, 14 फेब्रुवारी : टाटा सन्सने (Tata Sons) इल्कर (Ilker Ayci) यांची एअर इंडियाचे CEO आणि MD म्हणून नियुक्ती केली आहे. इल्कर आयसी अलीकडे तुर्की एअरलाइन्सचे ( Turkish Airlines) चेअरमन होते. इल्कर आयसी यांच्या नावाला मंजुरी देण्यासाठी एअर इंडियाच्या बोर्डाने सोमवार 14 फेब्रुवारी रोजी बैठक घेतली. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन हे देखील विशेष निमंत्रित म्हणून बोर्डाच्या बैठकीत उपस्थित होते. बोर्डाने योग्य विचारविनिमय केल्यानंतर एअर इंडियाचे CEO आणि MD म्हणून Ilkar IC यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली. 1 एप्रिलपासून जबाबदारी सांभाळणार टाटा सन्सने एका निवेदनात म्हटले आहे की इल्कर आयसी 1 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यापूर्वी आपली जबाबदारी स्वीकारतील. इल्कर आयसी यांच्या नियुक्तीबद्दल एन चंद्रशेखरन म्हणाले की, ते एव्हिएशन क्षेत्रातील आहेत, त्यांनी तुर्की एअरलाइन्स हाताळली आहे. इल्कर यांचे टाटा समूहात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, जेथे ते एअर इंडियाचे नवीन युगात नेतृत्व करतील.
#FlyAI : Mr. Ilker Ayci appointed as the CEO & MD of Air India. pic.twitter.com/KhVl0tfUlv
— Air India (@airindia) February 14, 2022
इल्कर आयसी याची शैक्षणिक पार्श्वभूमी इल्कल आयसी यांची जन्म 1971 मध्ये इस्तांबुलमध्ये झाला होता. ते तुर्कीतील बिल्केंट विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि पब्लिक अॅडमिनिस्ट्रेसन विभागाच्या 1994 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. 1995 मध्ये त्यांनी इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात राज्यशास्त्रावर रिसर्च रिपोर्ट सादर केला आणि 1997 मध्ये त्यांनी इस्तंबूलमधील मारमारा विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध मास्टर प्रोग्राम पूर्ण केला. Multibagger Stocks: शेअर बाजारात पडझडीदरम्यान ‘हे’ शेअर्स 500 टक्क्यांपर्यंत वाढले द वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, इल्कर आयसी तुर्की फुटबॉल फेडरेशन, तुर्की एअरलाइन्स स्पोर्ट्स क्लब आणि TFF Sportif Anonymous Sirketi चे बोर्ड सदस्य आहेत. ते कॅनेडियन तुर्की बिसनेस काऊंसिल आणि यूएस-तुर्की बिझनेस काऊंसिलचे सदस्य देखील आहेत. LIC IPO: देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीला IPO आणण्याची गरज काय? काय आहेत कारणं? वाचा सविस्तर 18 हजार कोटींची बोली लावून खरेदी तोट्यात चाललेली एअर इंडिया टाटा समूहाने 18,000 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केली होती. 8 ऑक्टोबर रोजी एअर इंडिया टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडला 18,000 कोटी रुपयांना विकली गेली. हा टाटा समूहाच्या होल्डिंग कंपनीचा एक भाग आहे.