मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Stocks: शेअर बाजारात पडझडीदरम्यान 'हे' शेअर्स 500 टक्क्यांपर्यंत वाढले

Multibagger Stocks: शेअर बाजारात पडझडीदरम्यान 'हे' शेअर्स 500 टक्क्यांपर्यंत वाढले

आज आम्ही तुम्हाला  बंपर कमाई केलेल्या अशाच काही मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल सांगत आहोत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना केवळ दीड महिन्यात मोठा परतावा दिला आहे. यातील काही शेअर्स 500 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 14 फेब्रुवारी : शेअर बाजारात (Share MArket) सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) आज 1747.08 अंकांनी किंवा 3 टक्क्यांनी घसरूण 56405.84 अंकांवर आला आहे. तर निफ्टी (Nifty) 531.95 अंकांनी किंवा 3.06 टक्क्यांनी घसरूण 16842.80 अंकांवर आला आहे. बाजारात कमजोरी असूनही, 2022 वर्षाच्या सुरुवातीनंतरही, मायक्रोकॅप आणि स्मॉलकॅपमधील अनेक स्टॉक्स मल्टीबॅगर (Multibagger) बनले आहेत. आज आम्ही तुम्हाला  बंपर कमाई केलेल्या अशाच काही मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल सांगत आहोत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना केवळ दीड महिन्यात मोठा परतावा दिला आहे. यातील काही शेअर्स 500 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. KIFS Financial Services KIFS फायनान्शियल सर्व्हिसेसचा यापैकीच एक आहे. जर आपण 2022 च्या मल्टीबॅगर स्टॉकची यादी पाहिली तर त्याचा परतावा सर्वात जास्त आहे. 31 डिसेंबर 2021 पासून 30 दिवसांसाठी KIFS फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स दररोज 5 टक्क्यांनी वाढले आहेत. यावर्षी आतापर्यंतच्या शेअर्सनी 500 टक्के परतावा दिला आहे. Shanti Educational Initiatives यावर्षी शांती एज्युकेशन इनिशिएटिव्हजच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 300 टक्के परतावा दिला आहे. शेअर्स गेल्या 30 दिवसांपासून सतत अप्पर सर्किटला टच करत आहे. स्मॉलकॅप सेगमेंटचा हा शेअर यावर्षी 95 रुपयांवरून 385 रुपयांपर्यंत वाढला आहे. DB Realty यावर्षी मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये डीबी रियल्टीचाही समावेश आहे. 2022 मध्ये आतापर्यंत 175 टक्के परतावा दिला आहे. येत्या काही महिन्यांत यामध्ये आणखी वाढ होऊ शकतो. या तेजीचे कारण म्हणजे सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला कंपनीचे 2 कोटी वॉरंट विकत घेत आहेत. विशेष म्हणजे गोदरेज प्रॉपर्टीजने डीबी रियल्टीमध्ये गुंतवणूक करण्याची योजना रद्द केल्यानंतरही राकेश झुनझुनवाला यांनी यात गुंतवणूक केली आहे.
First published:

Tags: Money, Share market

पुढील बातम्या