नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : सध्याचं युग डिजिटल युग आहे. रेल्वेतून (Railways) प्रवास करताना अनेक प्रवासी (passengers) तिकीट (Ticket) खिशात न ठेवता म्हणजेच स्वतःजवळ न बाळगता तिकिटाची सॉफ्ट कॉपी किंवा फोटो मोबाइलमध्ये ठेवतात. असं असलं तरीही तिकीट खिडकीवरून (ticket window) तिकीट खरेदी करून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. रेल्वेमधून प्रवास करताना खिशात ठेवलेलं तिकीट हरवलं, तर संपूर्ण प्रवासात टेन्शन राहतं. तिकिटासाठी पैसे खर्च केल्यानंतरसुद्धा टीटीई तर येत नाही ना, या चिंतेने मन व्यापलं जातं. टीटीईने पकडलं तर दंड होईल, सर्वांसमोर अपमान होईल, असे अनेक विचार मनामध्ये येतात; पण घाबरण्याची अजिबात गरज नाही. तुमचं तिकीट हरवल्यास, तिकिटाची तपासणी करणारी व्यक्ती मच्याकडे तिकीट नसतानाही तुमच्यावर विनातिकीट प्रवास करीत असल्याचा ठपका ठेवू शकत नाही. तसंच तो मोठा दंडही आकारू शकत नाही. अर्थात, यासाठी तुम्ही नियम पाळलेले असणं गरजेचं आहे. भारतीय रेल्वे (Indian Railways) आपल्या प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा देते. रेल्वेच्या नियमांची तुम्हाला माहिती हवी, जेणेकरून रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वेमध्ये कोणताही रेल्वे कर्मचारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. नियम जाणून घेतल्यास, तुम्ही टीटीईला (TTE) अतिरिक्त पैसे देणं टाळू शकता. तिकीट हरवल्याबाबत रेल्वेचे वेगवेगळे नियम आहेत. परंतु, तुम्हाला नियम माहीत नसल्यास, तिकीट तपासणारी (Ticket checking) व्यक्ती गैरफायदा घेऊन दंड वसूल करू शकते. वाचा : वयाच्या कोणत्या वर्षी LIC ची पॉलिसी घेणे फायदेशीर? मुलांचं भविष्य असं करा सुरक्षित तुमचं तिकीट हरवलं आणि तुमच्या मोबाइलमध्ये तिकीट नसेल, तर तुम्ही 50 रुपये दंड भरून नवीन तिकीट मिळवू शकता. तिकीट हरवल्यास, ताबडतोब टीटीईशी संपर्क साधा आणि त्याला त्याबाबत माहिती द्या. नवीन तिकीट देण्यास सांगा. यावर टीटीई अतिरिक्त शुल्क घेऊन नवीन तिकीट देऊ शकतात. रिझर्व्हेशन चार्ट तयार होण्यापूर्वी तुमचं तिकीट हरवल्याची माहिती दिल्यास, तुम्हाला 50 टक्के शुल्कासह नवीन तिकीट दिलं जातं. तुमचं तिकीट ज्या स्टेशनपर्यंत आहे, त्या स्टेशनच्या पुढे असणाऱ्या दुसऱ्या स्टेशनपर्यंत तुम्हाला अचानक प्रवास करावा लागला, तर टीटीईला कल्पना देऊन तुम्हाला पुढील प्रवासापर्यंत तिकीट वाढवण्यासाठी वेगळं शुल्क भरावं लागेल. वाचा : शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट (Platform ticket) असेल आणि काही कारणास्तव अचानक तुम्हाला रेल्वेमधून प्रवास करावा लागला, तर हे तिकीट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. अशा परिस्थितीत, तुम्ही रेल्वेमध्ये टीटीईशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला ज्या स्टेशनपर्यंत प्रवास करायचा आहे, त्या स्टेशनपर्यंतचं तिकीट घेऊ शकता. अशा वेळी टीटीई तिकिटाच्या भाड्यासह त्यावर ठरलेला दंड आकारून तुम्हाला तिकीट देऊ शकतो. तुमच्याकडे ज्या स्टेशनचं प्लॅटफॉर्म तिकीट आहे, त्याच स्टेशनपासून टीटीई प्रवासाचं तिकीट तयार करील. जर तुमची रेल्वे चुकली, तर प्रवासाच्या वेळेत तिकीट खिडकीवर परत केल्यास तुम्हाला काही पैसे रिफंड (Indian railways refund rules) मिळू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.