मुंबई, 6 डिसेंबर : देशातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या बचत ऑफर आणल्या आहेत. PNB ने एक विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये पैसे जमा केल्यास प्रचंड व्याज मिळत आहे. PNBची ही योजना 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी आहे. बँक महागड्या कर्जाच्या दरम्यान उत्तम परतावा मिळविण्याची चांगली संधी देत आहे. 600 दिवसांसाठी विशेष मुदत ठेवी करण्यासाठी बँक तब्बल 7.85 टक्के दरानं व्याज देत आहे.
FD वर PNBचा व्याजदर-
पंजाब नॅशनल बँक सध्या 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर चांगलं व्याज देत आहे. सर्वसामान्यांसाठी तो व्याजदर 3.50 ते 6.10 टक्के आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवरील व्याज दर 4 टक्के ते 6.90 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.30 ते 6.90 टक्के आहे.
हेही वाचा: पहिला पगार झाल्यावर त्वरित करा ‘हे’ काम! मिटेल आयुष्याचं टेन्शन
ऑनलाइन लाभ घेऊ शकता-
पंजाब नॅशनल बँक 600 दिवसांच्या मुदत ठेवींवर (कॉलेबल) 7 टक्के आणि 600 दिवसांच्या (नॉन-कॉलेबल) मुदत ठेवीवर 7.05 टक्के व्याज देत आहे. विद्यमान ग्राहक पीएनबी वन अॅप आणि इंटरनेट बँकिंगद्वारे या योजनेचा ऑनलाइन लाभ घेऊ शकतात. ग्राहक त्यांच्या जवळच्या शाखेत जाऊनही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पीएनबीनंही आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून या योजनेची माहिती दिली आहे.
पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं आहे की, 'जर तुम्ही 600 दिवसांच्या मुदत ठेव स्कीमसाठी अर्ज केला नसेल, तर आत्ताच करा आणि सर्वोत्तम व्याजदर मिळवा.'
600 दिवसांची विशेष FD-
600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेबाबत, पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि सीईओ अतुल कुमार गोयल यांनी सांगितलं की, आमचं उद्दिष्ट आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम श्रेणीतील योजना ऑफर करणं आहे. ग्राहकांना उच्च व्याजदर ऑफर करण्यात आम्हाला आनंद होत आहे. त्यामुळं ग्राहकांना त्यांच्या बचतीवर अधिक कमाई करता येईल.
स्पेशल स्कीमवर स्पेशल व्याज-
600 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर, पंजाब नॅशनल बँक सामान्य व्यक्तींसाठी जास्तीत जास्त 7 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.80 टक्के दरानं व्याज देते. परंतु 600 दिवसांसाठी विशेष एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.85 टक्के दरानं व्याज मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fixed Deposit, Pnb bank, Senior citizen