• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • तुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी

तुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी

आठवण म्हणून तुमच्याजवळसुद्धा 2 रुपयांची अशी एखादी नोट असेल तर तुम्हाला या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल.

 • Share this:
  मुंबई, 23 जून :  अनेकांना जुनी नाणी, जुन्या नोटा जमवण्याचा (Old Currency Note Auction)  छंद असतो. तुम्हालाही असाच छंद असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अशी बातमी आहे. अशीच जुनी नोट तुम्हाला लखपती बनवू शकते. फक्त 2 रुपयांच्या जुन्या नोटेपासून (2 Rupees Currency Note) तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. घरबसल्या अगदी सहजपणे कमाई करण्याची ही मोठी संधी आहे. सुरुवातीला एक-दोन रुपयांच्या छोट्या नोटा असायच्या. आता या जुन्या नोटा चलनात नाहीत. त्यांची छपाई होत नाह. त्यामुळे अशा नोटा दुर्मिळ (Rare Currency Notes) आहेत.  काही वेबसाईट्सवर अशा जुन्या नोटांचा लिलाव होतो.  आठवण म्हणून तुमच्याजवळसुद्धा अशी एखादी नोट असेल तर तुम्हाला या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल. हे वाचा - सलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं आता तुमच्याजवळ अशी दोन रुपयाची नोट असेल तर आधी ती खिशातून किंवा पाकिटातून बाहेर काढा. त्यावर  786 हा क्रमांक आहे का तपासा. हा क्रमांक अनेक जण शुभ मानतात. त्यामुळे किती तरी लोक या नोटेच्या शोधात आहेत आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारीही त्यांची आहे आणि एक या नोटेचा रंग गुलाबी असायला हवा आणि त्यावर आरबीआयचे माजी गव्हर्नर मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांची सहीसुद्धा असायला हवी. हे वाचा - भन्नाट ऑफर! दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर आता तुमच्याकडे अगदी अशीच नोट असेल तर तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही या नोटेचा लिलाव करू शकता. ईबे (Ebay) आणि क्लिक इंडिया (Click India) या वेबसाइट्सवर अशा नोटांचा लिलाव होतो. विक्रेता म्हणून या वेबसाईटवर नोंदणी करा. तुमच्याजवळी अँटिक करन्सी नोटचा फोटो काढून वेबसाईटवर अपलोट करा. ही नोट घेण्यासाठी इच्छुक असलेले ग्राहक थेट तुमच्याशी संपर्क करतील. तुम्हाला फायद्याच्या किमतीत ही नोट तुम्ही विकू शकता. (सूचना  - ही बातमी वेबसाईट्सवर मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही)
  Published by:Priya Lad
  First published: