मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत का? जाणून घ्या यामुळे होणारे 5 मोठे तोटे

तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत का? जाणून घ्या यामुळे होणारे 5 मोठे तोटे

जागतिक बँकेच्या (World Bank) 2017 च्या अहवालानुसार 2016 मध्ये देशातील जवळपास निम्म्या बचत खातेधारकांचे (Savings Account Holders) किमान एक बँक खातं निष्क्रिय (Dormant) अवस्थेत होतं. जगातलं हे सर्वात जास्त प्रमाण होतं.

जागतिक बँकेच्या (World Bank) 2017 च्या अहवालानुसार 2016 मध्ये देशातील जवळपास निम्म्या बचत खातेधारकांचे (Savings Account Holders) किमान एक बँक खातं निष्क्रिय (Dormant) अवस्थेत होतं. जगातलं हे सर्वात जास्त प्रमाण होतं.

जागतिक बँकेच्या (World Bank) 2017 च्या अहवालानुसार 2016 मध्ये देशातील जवळपास निम्म्या बचत खातेधारकांचे (Savings Account Holders) किमान एक बँक खातं निष्क्रिय (Dormant) अवस्थेत होतं. जगातलं हे सर्वात जास्त प्रमाण होतं.

    नवी दिल्ली, 19 मे : अनेकदा आपण वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती (Bank Accounts) उघडतो. कधी नोकरीसाठी, म्हणून कधी घराजवळ म्हणून, कधी सुविधा जास्त म्हणून तर कधी सुरक्षितता म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांनी एकापेक्षा जास्त बँक खाती उघडली जातात. मात्र अशी अनेक खाती असतील, तर ती सांभाळताना काळजी घेणं आवश्यक आहे. कारण अनेक खाती असल्याचे काही तोटेही आहेत. जागतिक बँकेच्या (World Bank) 2017 च्या अहवालानुसार 2016 मध्ये देशातील जवळपास निम्म्या बचत खातेधारकांचे (Savings Account Holders) किमान एक बँक खातं निष्क्रिय (Dormant) अवस्थेत होतं. जगातलं हे सर्वात जास्त प्रमाण होतं.

    किमान शिलकीसाठी अडकते मोठी रक्कम -

    टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, बहुतांश वेळा नोकरी बदलल्यानं बहुतेक पगारदार लोकांचं (Salaried Persons) बँक खातं बदललं जातं. याशिवाय गृह कर्ज खातं, डिमॅट खातं, वैयक्तिक बचत खातं अशी अनेक खाती उघडली जातात.अनेक बँक खाती असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुम्हाला कमीत कमी शिल्लक (Minimum Balance) ठेवण्यासाठी इतक्या सगळ्या खात्यांमध्ये मिळून भरपूर पैसे ठेवावे लागतील. किमान शिल्लक नसेल तर दंड आकारला जाईल आणि या किमान शिल्लक रक्कमेचा आपण काहीही वापर करू शकत नाही. कारण काहीही कारणानं ती काढली, तर शिल्लक कमी झाल्यानं दंड बसतो. बर्‍याच बँकांमध्ये किमान शिल्लक 5 ते 10हजार रुपये ठेवणे बंधनकारक असते. अशाप्रकारे आपले 25 ते 50 हजार रुपये हे अडकून पडतात.

    परताव्याचं नुकसान -

    आपण खात्यात किमान शिल्लक ठेवली तर त्यावर वार्षिक 3 ते 3.5 टक्के व्याज मिळतं, पण हेच पैसे आपण म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा मुदत ठेवीमध्ये गुंतवत असाल तर अधिक परतावा (Return) मिळेल. या व्यतिरिक्त प्रत्येक बँक डेबिट कार्ड (Debit Card) शुल्कासह इतर काही प्रकारचे शुल्क आकारते. तुम्ही कार्ड वापरता की नाही याचा बँकेला काही फरक पडत नाही. यामुळेही आपलं नुकसान होतं.

    (वाचा - सरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा)

    खाती डॉरमंट होण्याची शक्यता -

    नोकरीसाठी कंपनी किंवा ऑफिस जी पगारासाठीची खाती उघडते ती शून्य शिल्लक पगाराची खाती( Zero Balance Salary Accounts) असतात. नोकरी सोडल्यानंतर तीन महिन्यांनंतर पगार येत नसेल तर ते शून्य शिल्लक खातं सर्वसामान्य बचत खात्यात रूपांतरित होतं. त्यामुळे त्यात किमान शिल्लक राखणं आवश्यक ठरतं. एखादं खातं दोन वर्षांसाठी वापरलं गेलं नाही, त्यात कोणतेही व्यवहार झाले नाहीत, तर ते खाते डॉरमंट (Dormant) होतं. या खात्याद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकत नाही. डेबिट कार्ड, चेक, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग काहीही सुविधा वापरता येणार नाही. असं खातं पुन्हा सुरू करायचे असेल तर बँकेकडे अर्ज करावा लागेल. खातं संयुक्त असेल तर दुसर्‍या व्यक्तीची मान्यताही घ्यावी लागेल.

    कर भरताना व्याज मोजणी अवघड -

    आपल्याकडे अनेक बँक खाती असल्यास कर भरतानाही ( Tax Payment) त्रास होईल. 10 हजारांपर्यंत व्याज उत्पन्न करमुक्त आहे. त्यापेक्षा अधिक उत्पन्नावर कर आकारला जातो. अधिक खाती असल्यास व्याज उत्पन्न मोजणं कठीण होऊ शकतं. अर्थात यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी काळात परताव्याच्या फॉर्ममधील अन्य उत्पन्नाची माहिती आधीच भरलेली असेल, असं म्हटलं आहे. आपलं बँक खातं पॅनशी (Pan card) जोडलेलं आहे. त्याच पॅन नंबरच्या मदतीने आयकर विभाग (Income Tax Department) आपल्या कमाईची सर्व माहिती घेईल.

    पासवर्ड्स लक्षात ठेवणं सोपं -

    अलीकडच्या काळात डिजिटल बँकिंग फसवणुकीची (Digital Banking Frauds) प्रकरणं बरीच वाढली आहेत. त्यामुळं बँका सतत आपली सिक्युरिटी फीचर्स (Security Features) आणि तंत्रज्ञान बदलत असतात. तसंच वेळोवेळी पासवर्ड (Passwords) बदलण्याचा सल्लाही दिला जातो. अनेक बँक खाती असल्यामुळे आपल्याला या प्रत्येक बँक खात्याशी संबधित पासवर्ड नेहमी बदलणं आणि लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पासवर्ड्स लक्षात राहत नसतील, तर ते डायरी किंवा फोनमध्ये नोंदवून ठेवण्याचा पर्याय वापरला जातो, पण डायरी नेहमीच बरोबर ठेवता येते असं नाही आणि फोनमध्ये पासवर्ड ठेवणं सुरक्षित नसतं.

    (वाचा - घरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी)

    कर सल्लागार आणि अर्थतज्ज्ञ मुकेश कुमार झा यांच्या मते, प्रत्येकानं एक ते दोन बँक खाती ठेवावीत. एक आपलं पगाराचं खातं असेल, तर दुसरं आपलं वैयक्तिक बचत खातं असेल. पगारासाठीच्या खात्याकरता सर्व सेवा विनामूल्यअसतात, तर बचत खात्याच्या मदतीनं आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकता. कमी खाती असल्यानं आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवणं सोपं जाईल, किमान शिल्लक ठेवण्याचा भार कमी होईल, कर भरताना व्याजाचा हिशेब करणंही सोपं होईल.

    First published:

    Tags: Bank