नवी दिल्ली, 18 मे : केंद्र सरकार 50 हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. सरकारकडून एक खास कॉन्टेस्ट सुरू केलं जात आहे, ज्यात ही रक्कम बक्षीस रुपात दिली जाईल. या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या या कॉन्टेस्टमध्ये भाग घेता येणार आहे. या ऑफरअंतर्गत वन नेशन-वन रेशन कार्ड स्किमअंतर्गत लोगो बनवून तयार करायचा आहे. जर तुम्ही डिझाईनिंग करू शकत असाल, तर लॉकडाउनमध्ये हा तुमच्यासाठी इनकमचा चांगला सोर्स ठरू शकतो. My Gov India चं ट्विट - My Gov India च्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. यासाठी भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सुरू केलेल्या लोगो डिझाईन स्पर्धेचा भाग व्हावं लागेल. यासाठी 31 मे 2021 पर्यंत अर्ज करावा लागेल. या स्पर्धेत जिंकणाऱ्या व्यक्तीला 50 हजार रुपये बक्षीस रुपात दिले जातील. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला 50 हजार रुपयांसह कॉन्टेस्टचं ई-सर्टिफिकेट दिलं जाईल. प्रथम क्रमांकानंतर तीन स्पर्धकांनाही ई-सर्टिफिकेट दिलं जाईल.
Put on your creative cap! Design a logo for the One Nation One Ration Card plan and stand a chance to win a cash prize of Rs.50,000. Visit: https://t.co/puosLH2Bqx today! @fooddeptgoi @UNWFP_India pic.twitter.com/RFbk0pW1ge
— MyGovIndia (@mygovindia) April 29, 2021
असं करा रजिस्ट्रेशन - या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्वात आधी myGov.in पोर्टलवर जावं लागेल. येते कॉन्टेस्टमध्ये जाऊन लॉग इन टू पार्टिसिपेट टॅबवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्स भरावे लागतील. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची एन्ट्री दाखल करावी लागेल.
(वाचा - मोठी बातमी! उपचारासाठी, लसीकरणासाठी Aadhaar card अनिवार्य नाही,UIDAI कडून दिलासा )
कोण घेऊ शकतं या स्पर्धेत भाग - - लोगो डिझाईन स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील व्यक्ती भाग घेऊ शकतो. - एक स्पर्धेक अधिकाधिक तीन एन्ट्री करू शकतो. - Logo चा फॉर्मेट जेपीईजी (JPEG), बीएमपी (BMP) किंवा टीआयएफएफमध्ये (TIFF) हाय रिझॉल्यूशन (600 डीपीआय) इमेज असावी. - लोगो हिंदी किंवा इंग्रजी या कोणत्याही भाषेत असू शकतो. - लोगोबाबत 100 शब्दात माहिती असणं गरजेचं आहे.