मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पैसे दुप्पट करण्याची पोस्टाची खात्रीशीर योजना! 124 महिन्यात होईल रक्कम डबल; वाचा सविस्तर

पैसे दुप्पट करण्याची पोस्टाची खात्रीशीर योजना! 124 महिन्यात होईल रक्कम डबल; वाचा सविस्तर

कोरोनासारख्या संकटकाळात सरकारच्या छोटी बचत योजना (Small Saving Scheme) फायद्याच्या ठरतात. किसान विकास पत्र ही योजना अशाच काही स्मॉल सेव्हिंग स्कीमपैकी आहे.

कोरोनासारख्या संकटकाळात सरकारच्या छोटी बचत योजना (Small Saving Scheme) फायद्याच्या ठरतात. किसान विकास पत्र ही योजना अशाच काही स्मॉल सेव्हिंग स्कीमपैकी आहे.

कोरोनासारख्या संकटकाळात सरकारच्या छोटी बचत योजना (Small Saving Scheme) फायद्याच्या ठरतात. किसान विकास पत्र ही योजना अशाच काही स्मॉल सेव्हिंग स्कीमपैकी आहे.

    नवी दिल्ली, 05 जुलै :  कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus) पैशांची चणचण अनेकांना भासते आहे. अशावेळी आधीपासून आपण बचत केली असती तर आता फायदा झाला असता, अशी भावना अनेकांच्या मनात आहे. मात्र काहींना मोठी गुंतवणूक करणे शक्य नसते. अशावेळी सरकारच्या छोटी बचत योजना (Small Saving Scheme) फायद्याच्या ठरतात. किसान विकास पत्र ही योजना अशाच काही स्मॉल सेव्हिंग स्कीमपैकी आहे. पोस्टाच्या या योजनेमध्ये गुंतवणुकदाराचा पैसा सुरक्षित आहे आणि यामध्ये चांगला रिटर्न मिळण्याची हमी देखील आहे. या योजनेमध्ये व्याजदर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाही आधारावर निश्चित केला जातो. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार किसान विकास पत्राची मॅच्यूरिटी अवधी 124 महिने आहे. म्हणजेच या योजनेमध्ये ग्राहकाचे पैसे गुंतवणुकीच्या 124 महिन्या्ंनी म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यांनी दुप्पट होतील. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही मोदी सरकारची योजना या छोट्या बचतींपैकी एक आहे. . छोट्या बचतीसाठी किसान विकास पत्र सामान्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ही योजना घेऊ शकता काय आहे किसान विकास पत्र? हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असतं, जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जारी करण्यात येतं. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. तुम्ही याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकता. 2 जणांच्या नावावर देखील याची खरेदी करता येईल. यासाठी 2 पासपोर्ट साइझ फोटो, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.) निवास प्रमाणपक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबूक इ.) या कागदपत्रांची गरज लागेल. जर गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड देखील आवश्यक आहे. कसा होणार किसान विकास पत्र योजनेमध्ये पैसा दुप्पट ? काही दिवसांपूर्वीच वित्त मंत्रालयाने किसान विकास पत्रमध्ये (KVP) मिळणाऱ्या व्याजदरामध्ये कपात केल्याची घोषणा केली आहे. सरकार प्रत्येक तीन महिन्यासाठी व्याजदर निश्चित करते. आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीसाठी म्हणजे जून ते सप्टेंबरसाठी 6.9 व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. या दरामध्ये 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील, जर तुम्ही एकरकमी 1 लाख भरले तर तुम्हाला मॅच्यूरिटीनंतर 2 लाख रुपये मिळतील या योजनेत किती गुंतवणूक करू शकाल? किसान विकास पत्रमध्ये तुम्ही कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्हाला 110 महिन्यांची वाट पाहावी लागेल. फायनान्शिअल एक्सपर्ट यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचे सुचवतात. KVP मध्ये 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ज्याची खरेदी करता येईल. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Post office

    पुढील बातम्या