मुंबई, 17 नोव्हेंबर: पॅन कार्डचं महत्त्व आता खूप वाढलं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापासून ते बँक खातं उघडणं, व्यवसाय सुरू करणं आणि मालमत्ता खरेदी-विक्री करणं आता आवश्यक झालं आहे. आता त्याशिवाय आर्थिक कामं करणं जवळपास अशक्य आहे, असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे पॅनकार्ड हरवल्यास व्यक्ती अडचणीत येते. मात्र यामध्ये काळजी करण्यासारखं फारसं काही नाही. याचं कारण आयकर विभाग पॅनकार्डधारकांना इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो.
त्यामुळं तुमचं पॅन कार्डही हरवलं असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. चांगली गोष्ट म्हणजे बहुतांश वित्तीय संस्था ई-पॅन कार्ड स्वीकारतात. पॅन कार्ड हा आयकर विभागानं जारी केलेला 10 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे. दुसरीकडे ई-पॅन हे व्हर्च्युअल पॅन कार्ड आहे, जे आवश्यकतेनुसार कोठेही ई-पडताळणीसाठी वापरलं जाऊ शकतं.
सांभाळून ठेवा पॅनकार्ड-
तथापि प्राप्तिकर विभाग नेहमी पॅन कार्ड वापरकर्त्यांना ते सुरक्षित ठेवण्याचं आणि त्याशी संबंधित माहिती अज्ञात लोकांसोबत शेअर न करण्याचं आवाहन करते. पॅन कार्डशी संबंधित फसवणूक आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात इतर लोकांनी अनेक लोकांच्या पॅनकार्डवर कर्ज घेतलं आहे किंवा इतर काही कारणांसाठी त्याचा वापर केला आहे.
हेही वाचा: फायद्याची बातमी! ‘या’ दोन बँकांनी वाढवले FDचे व्याजदर, किती होणार फायदा?
असं डाउनलोड कार ई-पॅन कार्ड:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PAN, Pan Card, Pan card online