मराठी बातम्या /बातम्या /मनी /फायद्याची बातमी! ‘या’ दोन बँकांनी वाढवले FDचे व्याजदर, किती होणार फायदा?

फायद्याची बातमी! ‘या’ दोन बँकांनी वाढवले FDचे व्याजदर, किती होणार फायदा?

फायद्याची बातमी!‘या’ दोन बँकांनी वाढवले FDचे व्याजदर, कितीने होणार फायदा?

फायद्याची बातमी!‘या’ दोन बँकांनी वाढवले FDचे व्याजदर, कितीने होणार फायदा?

अ‍ॅक्सिस बँकेनं एका महिन्यात दोनदा एफडीचे दर वाढवले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर व्याजदर वाढवण्यात आले आहेत. अलीकडेच अ‍ॅक्सिस बँकेनं 46 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 115 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे, जी 5 नोव्हेंबरपासून लागू झाली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 नोव्हेंबर: देशातील दोन मोठ्या खासगी बँकांनी मुदत ठेवींच्या दरांमध्ये (एफडी दर) वाढ केली आहे. या दोन बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांचा समावेश आहे. अॅक्सिस बँकेनं एका महिन्यात दोनदा एफडी दर वाढवला आहे. दुसरीकडे ICICI बँकेनं 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. या बँकेचे नवे दर 16 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर व्याजदर 30 बेसिस पॉइंट्स पर्यंत वाढला आहे. आता 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 3 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. हा दर सर्वसामान्यांसाठी आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.75 ते 6.50 टक्के व्याज दिलं जात आहे.

दुसरीकडे, अ‍ॅक्सिस बँकेनं एका महिन्यात दोनदा एफडीचे दर वाढवले ​​आहेत. 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर व्याजदर वाढवण्यात आले आहेत. अलीकडेच अ‍ॅक्सिस बँकेनं 46 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 115 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे, जी 5 नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. या महिन्यात दुसर्‍यांदा, अ‍ॅक्सिस बँकेनं एफडी दरात 20 बेसिस पॉइंट्सनं वाढ केली आहे.

अ‍ॅक्सिस बँकेनं पुढील 15 ते 18 महिन्यांत मुदतपूर्ती होणाऱ्या एफडीवरील व्याजदरात 15 बेसिस पॉईंट्सनी 6.40 टक्के वाढ केली आहे आणि पुढील 18 महिन्यांपासून ते 3 वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 20 बेसिस पॉईंट्सनी वाढ केली आहे. हा दर आता 6.50 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

हेही वाचा: पुढचे 2 दिवस बँक बंद आजच करा काम, ATM मध्येही खडखडाट?

ICICI बँकेची वाढ-

15 ते 18 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या FD वरील सध्याचा व्याजदर 6.10 टक्क्यांवरून 30 बेस पॉइंट्सनं वाढवून 6.40 टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणं 18 महिने ते 2 वर्षांच्या मुदतीच्या FD वरील व्याजदर 6.15 टक्क्यांवरून 6.40 टक्क्यांपर्यंत 25 आधार अंकांनी वाढला आहे. 2 वर्ष, 1 दिवस ते 3 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 6.50 टक्के व्याज दिले जाईल. यापूर्वी हा व्याजदर 6.20 टक्के होता, त्यात 30 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. 3 वर्ष, 1 दिवस ते 5 वर्षात मॅच्युअर होणार्‍या FD वर आता 6.60 टक्के व्याज मिळेल, पूर्वी हा दर 6.35 टक्के होता.

ICICI बँकेनं 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षात मॅच्युअर होणार्‍या FD वरील व्याजदर 6.25 टक्के वरून 6.50 टक्के आणि 5 वर्षात (80C FD) परिपक्व होणार्‍या FD वर 25 bps ने वाढ केली आहे. दर 6.35 टक्के वरून 6.60 टक्के केला आहे.

अ‍ॅक्सिस बँकेचे नवीन दर-

Axis Bank 9 महिने ते 1 वर्षाच्या FD वर 5.50 टक्के व्याज देणं सुरू ठेवेल. त्याचप्रमाणं 1 वर्ष ते 15 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 6.25 टक्के व्याज दिलं जाईल. 15 ते 18 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीच्या दरात 15 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हा दर 6.25 टक्के होता, तो आता 6.40 टक्के करण्यात आला आहे. 18 महिने ते 3 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD मध्ये 20 बेस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे आणि हा दर 6.50 टक्क्यांवर गेला आहे. 3 ते 10 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळेल कमी केलं आहे.

First published:

Tags: Axis Bank, Fixed Deposit, Icici bank