Home /News /money /

ATM मधून मिळालेल्या फाटक्या नोटांचं काय कराल? बँकेनं बदलून न दिल्यास करता येईल तक्रार

ATM मधून मिळालेल्या फाटक्या नोटांचं काय कराल? बँकेनं बदलून न दिल्यास करता येईल तक्रार

ATM machine

ATM machine

कोणत्याही सरकारी बँकेत (Public Sector Bank) जाऊन फाटक्या नोटा बदलून घेऊ शकतात किंवा ज्या बँकेच्या एटीएममधून त्या नोटा मिळाल्या आहेत, त्या बँकेत जाऊन तक्रार करू शकतात.

नवी दिल्ली, 02 जुलै: एटीएममधून (ATM) पैसे काढताना अनेकदा आपल्याला फाटक्या किंवा खराब नोटा (Torn Notes) मिळतात. काहीवेळा नोटा फाटलेल्या असतात, किंवा त्या चिकटवलेल्या असतात. कधी त्यावर लिहिलेलं असतं, कधी शाई लागलेली असते. अशा नोटा कोणी घ्यायला तयार नसतं, त्यामुळं त्या व्यवहारात वापरणे शक्य नसते. अशावेळी ग्राहकांना या खराब नोटा बँकेतून (Bank) बदलून आणण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र अनकेदा ग्राहकांनी बँकेत जाऊन नोटा बदलून देण्याची मागणी केल्यास बँका नकार देतात. काहीतरी कारणे सांगून नोटा देण्यास टाळाटाळ करतात. मात्र असा अनुभव आला तरी काळजी करण्याचं कारण नाही. कारण ग्राहकांच्या अशा अडचणी सोडवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) याबाबतीत काही नियम केले आहेत. या नियमांनुसार ग्राहक थेट कोणत्याही सरकारी बँकेत (Public Sector Bank) जाऊन फाटक्या नोटा बदलून घेऊ शकतात किंवा ज्या बँकेच्या एटीएममधून त्या नोटा मिळाल्या आहेत, त्या बँकेत जाऊन तक्रार करू शकतात. बँकांनी टाळाटाळ केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार (Police Complaint) करण्याचा अधिकार देखील ग्राहकाला आहे. त्यामुळं खराब नोटा आल्यास काळजी करण्याचं काहीही कारण नाही. त्या बदल्यात चांगल्या नोटा मिळण्याची हमी रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. हे वाचा-सामान्यांना मोठा दिलासा! उतरले डाळींचे दर, वाचा किती कमी किंमती बँकेत करावा लागेल अर्ज ज्या एटीएममधून फाटक्या नोटा मिळाल्या असतील त्या एटीएमच्या बँकेत ग्राहकाला अर्ज करावा लागेल. यामध्ये एटीएममधून पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि ठिकाण लिहावे लागेल. तसेच, पैसे काढल्याची स्लिप जोडावी लागेल. स्लिप नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजचा तपशील द्यावा लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 2017 मधील एक्सचेंज करन्सी नोट नियमांनुसार तुम्हाला एटीएममधून फाटक्या, खराब नोटा मिळाल्यास तुम्ही त्या सहजपणे बदलून घेऊ शकता. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतीही सरकारी बँक अशा नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. ग्राहकानं दिलेल्या अर्जातील माहितीची पडताळणी केल्यानंतर, बँक तुम्हाला खराब नोटा बदलून चांगल्या नोटा देते. या प्रक्रियेला जास्त वेळ लागत नाही. हे वाचा-LIC ने लाँच केला नवा प्लॅन! एकदा प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000 बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागू शकते रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार कोणतीही बँक एटीएममधून आलेल्या खराब, फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. तरीही बँकांनी या नियमाचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचार्‍यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकानं तक्रार केल्यास बँकेला 10 हजारांपर्यंत नुकसान भरपाईदेखील द्यावी लागू शकते.
First published:

Tags: ATM, Bank, Money, Police complaint, Reserve bank of india, Sbi ATM

पुढील बातम्या