विकेंण्डला बँकेचा संप, ATMमध्ये खडखडाट होण्याची शक्यता

विकेंण्डला बँकेचा संप, ATMमध्ये खडखडाट होण्याची शक्यता

सलग 3 दिवस बंद राहणार बँका,आधीच करून घ्या ही कामं

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी: पगार आणि आर्थिक व्यवहार यांसंबधी व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आपली बँकेतील महत्त्वाची कामं आज आणि उद्या उरकून घ्या अन्यथा पुढचे तीन दिवस तुमची कामं खोळंबणार आहेत. त्याचं कारण म्हणजे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असं तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. या कालावधीमध्ये ग्राहकांना केवळ ऑनलाईन बँकिंगची सुविधा उपलब्ध असेल. तीन दिवस सलग बँका बंद राहिल्यानं ATM यंत्रणेवरही ताण येण्याची शक्यता आहे. याआधी 8 जानेवारीला भारत बंदला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र वेगवेगळ्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

काय आहेत बँक कर्मचाऱ्याच्या मागण्या

देशव्यापी संपामुळे बँका आणि कार्यालयांचं कामकाज विस्कळित होऊ नये यासाठी हरतऱ्हेचे उपाय करण्यात आलेत. पण तरीही बंद चा परिणाम होऊ शकते. पगारवाढीबद्दल बँक कर्मचारी संघटना आणि सरकारची चर्चा समाधानकारक झाली नाही. त्यामुळे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.

हेही वाचा-BUDGET 2020 : 1 फेब्रुवारीनंतर तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

संपात कोणाचा सहभाग?

इंडियन बँक असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 9 संघटनांचा सहभाग असलेल्या युनायडेट फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटनांचा यामध्ये समावेश आहे. यामुळेच तुमची बँकेची जी कामं उरली असतील ती कामं लगेच करून घ्या, असं SBI ने म्हटलं आहे.

ग्राहकांवर काय होणार परिणाम

या कालावधीमुळे ग्राहकांना फक्त ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येणार आहे. तीन दिवस बँका बंद असल्यानं डीडी आणि चेक क्लीअर होणार नाही. त्यामुळे पैशांसाठी ATM सेवा मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ शकते. त्यामुळे या सेवेवर ताण पडू शकतो. तुम्हा बाहेरगावी जाणार असाल तर आजच पैशांचे व्यवहार करून घ्या.

हेही वाचा-मुलांच्या अ‍ॅडमिशनसाठी आधार कार्ड गरजेचं, ही कागदपत्रं सादर करून बनवा कार्ड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2020 08:06 AM IST

ताज्या बातम्या