मुंबई, 25 जानेवारी: नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर आपलं उत्पन्न वर्षाला 2.50 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला कंपनीला आपली माहिती देणं बंधनकारक आहे. माहिती योग्य वेळेत न दिल्यास तुमच्या पगारातून काही रक्कम कापली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही माहिती प्रत्येक नोकरी करणाऱ्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला कंपनीमध्ये पॅन आणि आधारकार्डचे तपशील देणं बंधनकारक आहे. प्रत्यक्षात, प्राप्तिकर विभागाच्या नवीन नियमांनुसार जर एखादा कर्मचारी या दोन्हींची माहिती देत नसेल तर त्याच्या पगारातून 20 टक्के रक्कम कापून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आपला पगार कंपनीने कापण्याआधीच या दोन गोष्टींची खबरदारी घेतली तर 20 टक्के पगार कापला जाणार नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Taxation) 16 जानेवारीपासून हा नियम लागू केला आहे. हा नियम ज्यांचे उत्पन्न वर्षाकाठी 2.50 लाख आणि त्याहून अधिक आहे त्यांना लागू असेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून यासंदर्भातील 86 पानांचे पत्रक जारी केले आहे. कर्मचार्यांना आयकर कायद्याच्या कलम 206-AA अंतर्गत पॅन आणि आधार क्रमांक देणे बंधनकारक आहे. जर कर्मचारी या दोन्हीची माहिती देत नसेल कंपनी एकतर त्यांच्या वार्षिक पगारावर कर कमी करू शकते किंवा 20% कपात करू शकतो. असं या पत्रकात म्हटलं आहे. हेही वाचा- पुढच्या आठवड्यात सलग 3 दिवस बंद राहणार बँका,आधीच करून घ्या ही कामं हेही वाचा- SBI ग्राहकांसाठी खूशखबर, आता डेबिट कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज नाही हेही वाचा- महाराष्ट्राच्या या बळीराजाला सलाम, शेतीला पुरक व्यवसायातून मिळवतो 2 लाख रुपयांचा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.