नवी दिल्ली, 24 जानेवारी : या महिनाअखेरीला तुम्हाला बँकांची कामं करायची असतील तर वाट बघू नका. ही कामं आधीच करून घ्या. 31 जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा परिणाम बँकांच्या कामकाजावर होऊ शकतो, असं SBI ने म्हटलं आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला देशव्यापी संप आहे. त्याचबरोबर 2 फेब्रुवारीला रविवार आहे. त्यामुळे बँका तीन दिवस बंद राहू शकतात.
पगारवाढीची मागणी
देशव्यापी संपामुळे बँका आणि कार्यालयांचं कामकाज विस्कळित होऊ नये यासाठी हरतऱ्हेचे उपाय करण्यात आलेत. पण तरीही बंद चा परिणाम होऊ शकते. पगारवाढीबद्दल बँक कर्मचारी संघटना आणि सरकारची चर्चा समाधानकारक झाली नाही. त्यामुळे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
संपात कोणाचा सहभाग?
इंडियन बँक असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 9 संघटनांचा सहभाग असलेल्या युनायडेट फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटनांचा यामध्ये समावेश आहे.
(हेही वाचा : इनकम टॅक्सचा नवा नियम, या 2 गोष्टींची माहिती दिली नाही तर कापला जाईल पगार)
बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या संघटनेने हा संप पुकारल्यामुळे देशभरात बँकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
यामुळेच तुमची बँकेची जी कामं उरली असतील ती कामं लगेच करून घ्या, असं SBI ने म्हटलं आहे.
===========================================================================================