SBI ग्राहकांसाठी खूशखबर, आता डेबिट कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज नाही

SBI ग्राहकांसाठी खूशखबर, आता डेबिट कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज नाही

काय आहे SBI Virtual Card? डेबिट आणि Virtual कार्डमध्ये काय फरक आहे?

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी: भारतीय स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी खास SBI Virtual Card जारी केलं आहे. यानंतर, ग्राहकांना यापुढे ऑनलाइन खरेदीसाठी प्लास्टिक कार्डची आवश्यकता भासणार नाही. Virtual Card मुळे आता ग्राहकांना आपलं कार्ड गमावण्याची भीती असणार नाही.

SBI Virtual Card म्हणजे काय? का वापरलं पाहिजे तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर अशावेळी तुमचं सेव्हिंग अकाऊंट सुरक्षित राहण्यासाठी Virtual Card कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या खात्याची माहिती कोणालाही कळू शकत नाही. हा डेबिटकार्डचाच प्रकार आहे. मात्र ऑनलाईन व्यवहारासाठी वापरण्यात येतं. Virtual Card तुम्हाला ATM मध्ये वापरता येणार नाही किंवा त्यातून कोणत्याही प्रकारे पैसे काढू शकणार नाही. आपल्या खात्याची सुरक्षितता जपण्यासाठी हे कार्ड वापरलं तर आपल्याला फायदा अधिक होईल. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिक कार्डची सर्व वैशिष्ट्येही यात उपलब्ध असतील. या कार्डचं वैशिष्ट्यं काय जाणून घ्या.

1.SBI Virtual Cardच्या मदतीने ग्राहक त्यांच्या खात्याच्या तपशीलांची माहिती लपवू शकतील. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल असा बँकेचा दावा आहे.

2.SBI Virtual Cardची वैधता 48 तास असेल. तोपर्यंत हे कार्ड वापरले जाऊ शकते.

3.या कार्डची निर्मिती आणि व्यवहार प्रक्रिया केवळ One Time Passwordच्या मदतीने केली जाऊ शकते. हा OTP फक्त नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवर येईल. हा OTP कोणालाही सांगू नये. त्यामुळे तुमचं खातं रिकामं होऊ शकतं असा सावधानतेचा इशारा बँकेनं दिला आहे.

4.SBI ग्राहक त्यांच्या इंटरनेट बँकिंगचा वापर करून आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकतात.

5. SBI Virtual Cardसाठी किमान व्यवहार मर्यादा 100 रुपये असेल आणि कमाल मर्यादा 50,000 रुपये असेल.

6.SBI Virtual Cardचा उपयोग मर्चेंट साइटवर केला जाऊ शकतो. वीजा कार्ड्स स्वीकारणाऱ्या ठिकाणीच ह्या कार्डचा वापर होऊ शकतो.

7. SBI Virtual Cardचा फक्त एकाच वापरासाठी असेल. याचा अर्थ असा की जर आपण ते व्यवहारासाठी वापरत असाल तर आपण त्यावरून दोन वेळा व्यवहार करू शकणार नाही. एकावेळी एकच व्यवहार केला जाऊ शकतो.

8. आपली खरेदी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावरच या कार्डमधून रक्कम वजा केली जाईल.

First published: January 25, 2020, 8:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading