Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PF संबंधित काही तक्रार असल्यास ऑफिसला फेऱ्या मारण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन होईल काम; चेक करा प्रोसेस

PF संबंधित काही तक्रार असल्यास ऑफिसला फेऱ्या मारण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन होईल काम; चेक करा प्रोसेस

EPFO ​​च्या बहुतेक सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. ईपीएफओच्या ऑनलाइन सेवा ईपीएफओच्या वेबसाइटवर तसेच उमंग अॅपवरही मिळू शकतात.

EPFO ​​च्या बहुतेक सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. ईपीएफओच्या ऑनलाइन सेवा ईपीएफओच्या वेबसाइटवर तसेच उमंग अॅपवरही मिळू शकतात.

EPFO ​​च्या बहुतेक सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. ईपीएफओच्या ऑनलाइन सेवा ईपीएफओच्या वेबसाइटवर तसेच उमंग अॅपवरही मिळू शकतात.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 14 मे : भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO मध्ये तुमचंही खातं असल्यास, ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. पीएफ खात्याशी संबंधित काही तक्रार असेल तर तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमची तक्रार ऑनलाइन नोंदणी करून सोडवू शकता. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या तक्रारीचे स्टेटसही ऑनलाइन पाहू शकता.

जर एखाद्या EPF खातेधारकाला पैसे काढणे, EPF खाते ट्रान्सफर करणे, KYC इत्यादींशी संबंधित कोणतीही तक्रार असेल, तर खातेधारक या तक्रार व्यवस्थापन प्रणालीच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. EPFO ने यूजर्ससाठी epfigms.gov.in वर त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून त्यांच्या समस्यांबद्दल ऑनलाइन माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

mAadhaar App: कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड प्रोफाईल एकाच ठिकाणी करा सेव्ह; चेक करा संपूर्ण प्रोसेस

EPFO ने एक टोल फ्री नंबर देखील जारी केला आहे ज्यावर तुम्ही कॉल करून तुमची तक्रार सहज नोंदवू शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की EPFO ​​च्या बहुतेक सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. ईपीएफओच्या ऑनलाइन सेवा ईपीएफओच्या वेबसाइटवर तसेच उमंग अॅपवरही मिळू शकतात.

अशा प्रकारे ऑनलाइन तक्रार दाखल करा?

>> सर्वप्रथम epfigms.gov.in या पोर्टलवर जा.

>> तक्रार नोंदवण्यासाठी 'रजिस्टर ग्रीव्हन्स' वर क्लिक करा.

>> तुमच्या समोर एक नवीन वेबपेज उघडेल. यामध्ये, ज्या स्टेटसमध्ये तक्रार नोंदवली जात आहे ते निवडा.

>> स्टेटस म्हणजे पीएफ सदस्य, ईपीएस पेन्शनर, नियोक्ता किंवा इतर.

>> तुमच्याकडे UAN/पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नसल्यासच 'इतर' पर्याय निवडा.

>> पीएफ खात्याशी संबंधित तक्रारीसाठी, 'पीएफ मेंबर' स्टेटस निवडा.

>> आता UAN आणि सुरक्षा कोड टाका आणि 'Get Details' वर क्लिक करा.

>> UNN शी लिंक मास्क्ड वैयक्तिक तपशील स्क्रीनवर दिसतील.

>> आता 'Get OTP' वर क्लिक करा.

>> EPFO डेटाबेसमध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर OTP पाठवला जाईल.

>> OTP एंटर केल्यानंतर, व्हेरिफाय होईल आणि नंतर तुम्हाला वैयक्तिक तपशील विचारले जातील.

>> वैयक्तिक तपशील एंटर केल्यानंतर, ज्या पीएफ क्रमांकावर तक्रार दाखल करायची आहे त्यावर क्लिक करा.

>> आता स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल. यामध्ये तुमची तक्रार ज्या रेडिओ बटणाशी संबंधित आहे ते निवडा.

>> तक्रार कॅटगरी निवडा आणि तुमच्या तक्रारीचा तपशील द्या.

>> तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते अपलोड करता येतील.

>> तक्रार नोंदवल्यानंतर 'Add' वर क्लिक करून सबमिट वर क्लिक करा.

>> तुमची तक्रार नोंदवली जाईल.

>> तक्रार नोंदणी क्रमांक तुमच्या नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल.

Health Insurance घेताना 'या' गोष्टी तपासून घ्या, अन्यथा गरजेच्या वेळी होईल मनस्ताप

तक्रारीची स्थिती कशी तपासाल?

तुमच्या तक्रारीची स्थिती तपासण्यासाठी, epfigms.gov.in वर क्लिक करा. येथे तुम्हाला View Status हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी येथे टाका. त्यानंतर सिक्युरिटी कोड टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या तक्रारीची स्थिती दिसेल.

First published:

Tags: Epfo news, Money, Pf news