Home /News /money /

KDMC ची भन्नाट शक्कल! या योजनेतून शहर तर स्वच्छ होईलच पण गरीबांचं पोटही भरेल

KDMC ची भन्नाट शक्कल! या योजनेतून शहर तर स्वच्छ होईलच पण गरीबांचं पोटही भरेल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) एक भन्नाट शक्कल लढवत शहर स्वच्छ करण्याची योजना आखली आहे. या प्रयोगामुळे शर तर स्वच्छ होईलच पण त्याचबरोबर गरीबांना जेवणंही मिळेल.

    मुंबई, 21 डिसेंबर: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) शहरातील कचरा कमी करण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. केडीएमसी कडून राबवण्यात येणाऱ्या या योजनेतून शहरातील कचरा तर साफ होईलच पण त्याचबरोबर गरीबांना अन्न देखील मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (Kalyan Dombivli Municipal Corporation) प्लॅस्टिक कचरा शहरातून संपवण्यासाठी ही नवी योजना आखली आहे. 5 किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करणाऱ्याला जेवणाचे कूपन (Food Coupons) देण्याची ही योजना आहे. दीर्घकाळापासून कल्याण-डोंबिवली आणि परिसरातील इतर शहरांमध्ये कचऱ्याची गंभीर समस्या आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने ही नामी युक्ती शोधली आहे. 'झिरो वेस्ट' पॉलिसीअंतर्गत फूड कूपन योजनेची आखणी केडीएमसीच्या 'झिरो वेस्ट' (Zero Waste) धोरणाचा एक भाग म्हणून ही योजना सुरू केली गेली आहे, असे व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, 'नवीन  उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही नागरिकांना प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे आवाहन केले आहे. एखाद्या केंद्राला 5 किलो प्लास्टिक कचरा दिल्यास त्या बदल्यात त्यांना 'पोळी-भाजी' (चपाती-भाजी) साठी कूपन मिळेल. याची किंमत 30 रुपये असेल. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, बाजारांव्यतिरिक्त केडीएमसीने विविध ठिकाणी असणाऱ्या वेस्ट कलेक्शन सेंटरबरोबर मिळून ही योजना आखली आहे. (हे वाचा-11 दिवसांनी लागू होणार तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे महत्त्वाचे नियम) (हे वाचा-अपघात प्रसंगी मोदी सरकारची योजना ठरेल फायद्याची, जाणून घ्या कसा करता येईल क्लेम) केडीएमसीचं असं उद्दिष्ट्य आहे की, कल्याण-डोंबिवलीला कचरामुक्त करायचं. 'झिरो वेस्ट'चं ध्येय पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. यासह संपूर्ण देशासाठी एक उदाहरण द्यायचे आहे की, एकीकडे शहरातील कचरा साफ करता येईल आणि दुसरीकडे थोडी मेहनत घेतल्यानंतर शहरातील कुणीही भुकेलं राहणार नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या