जाहिरात
मराठी बातम्या / मनी / IDFC First बँकेच्या ग्राहकांना खूशखबर! बँकेकडून FD वरील व्याजदर वाढवले

IDFC First बँकेच्या ग्राहकांना खूशखबर! बँकेकडून FD वरील व्याजदर वाढवले

IDFC First बँकेच्या ग्राहकांना खूशखबर! बँकेकडून FD वरील व्याजदर वाढवले

IDFC फर्स्ट बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी व्याजदर वाढवले ​​आहेत. नवीन दर 16 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑगस्ट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. दरम्यान, खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेने फिक्स्ड डिपॉझिटवर म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 16 ऑगस्ट 2022 पासून लागू IDFC फर्स्ट बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी व्याजदर वाढवले ​​आहेत. नवीन दर 16 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत. बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2 कोटीपेक्षा कमी एफडीवर 3.50 टक्के ते 6.00 टक्के व्याजदर देत आहे. यासोबतच बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त व्याजदर देत आहे. PM Vaya Vandana Yojana: विवाहित जोडप्यांनो, या सरकारी योजनेत करा गुंतवणूक, दरमहा मिळतील 18500 रुपये IDFC फर्स्ट बँक व्याज दर 7 ते 14 दिवस - 3.50 टक्के 15 ते 29 दिवस - 3.50 टक्के 30 ते 45 दिवस - 4.00 टक्के 46 ते 90 दिवस - 4.00 टक्के 91 ते 180 दिवस - 4.50 टक्के 181 दिवस ते 1 वर्ष - 5.75 टक्के 1 वर्ष 1 दिवस ते 499 दिवस - 6.25 टक्के 500 दिवस ते 2 वर्षे - 6.50 टक्के 2 वर्षे 1 दिवस-749 दिवस- 6.50 टक्के 750 दिवस - 6.90 टक्के 751 दिवस - 3 वर्षे - 6.50 टक्के 3 वर्षे 1 दिवस - 5 वर्षे - 6.50 टक्के 5 वर्षे 1 दिवस-10 वर्षे - 6.00 टक्के

UPI च्या नियमात बदल होण्याची शक्यता; काय आहे RBIचं प्लॅनिंग? वाचा सविस्तर

ICICI बँकेनेही व्याजदर वाढवले ICICI बँकेनेही आपले व्याजदर वाढवले आहेत. नवे व्याजदर 19 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. ICICI बँकेच्या FD वरील नवीन व्याजदर 2 कोटींहून अधिक आणि 5 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर लागू होतील. ICICI बँक आता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या FD वर जास्त व्याज देईल. सामान्य ग्राहकांना 2.75% ते 5.90% आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.25% ते 6.60% व्याज मिळेल. 7 दिवस ते 14 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर सामान्य ग्राहकांना 3.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.25 टक्के व्याज मिळेल. 15 ते 29 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर, सामान्य ग्राहकांना 3.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.25 टक्के व्याज मिळेल. 30 दिवस ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर बँक आता सर्वसामान्य ग्राहकांना 3.35 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.35 टक्के व्याज देईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात