मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमचंही 'या' बँकेत खातं आहे का? अशाप्रकारे मिळेल 2 लाख आणि 4 लाखांचा फायदा

तुमचंही 'या' बँकेत खातं आहे का? अशाप्रकारे मिळेल 2 लाख आणि 4 लाखांचा फायदा

तुमचंही सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of India) खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जाणून घ्या या खातेधारकांना कोणते फायदे मिळतील

    नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: तुमचंही सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of India) खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्राहकांना अनेक फायदे उपलब्ध करून देते आहे. अनेक ग्राहकांना बँकेकडून देण्यात येणाऱ्या या बेनिफिट्सबद्दल माहिती नसते. या बातमीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही 2 लाखांचा फायदा मिळवू शकता. शिवाय वार्षिक 342 रुपये देऊन तुम्ही 4 लाख रुपयांचे एक्स्ट्रा बेनिफिट देखील मिळवू शकता. जाणून घ्या काय आहेत ही बँकेतील या महत्त्वाच्या योजना फ्रीमध्ये कशी मिळेल 2 लाखांची सुविधा बँकेकडून जनधन खाते (Jandhan Account holders Benefits) असणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा मिळेल. बँकेतील जनधन खातेधारकांना 2 लाख रुपयांर्यंतचा अपघाती वीमा कव्हर मिळेल. हे वाचा- 4 लाखांच्या फायद्यासाठी काय कराल? 4 लाखांचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन खास योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना आहेत पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना (PMSBY). या योजनांमध्ये कमी गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा मिळेल. या दोन्ही योजनात मिळून तुम्हाला केवळ 342 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. PMJJBY मध्ये वार्षिक 330 रुपये भरून मिळेल फायदा पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजनेत वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला लाइफ कव्हर मिळेल. जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळते. हे वाचा- पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना   पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana-PMSBY) अत्यंत कमी प्रीमियममध्ये जीवन वीमा देऊ करते. ही केंद्र सरकारची अशी स्कीम आहे ज्याअंतर्गत खातेधारकाच्या खात्यातून केवळ 12 रुपयांचा प्रीमियम जातो आणि 2 लाखांचा इन्शुरन्स कव्हर मिळतो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Insurance, Money

    पुढील बातम्या