मुंबई, 15 नोव्हेंबर : मेटल शेअर्सनी गेल्या 1 वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न दिला आहे. या क्षेत्रातील प्रमुख शेअर्सनी मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Returns) दिला आहे. यातील काही मल्टीबॅगर स्टॉक्स असे आहेत ज्यात तज्ज्ञांना आणखी वाढ अपेक्षित आहे. हिंदाल्को इंडस्ट्रीज (Hindalco Industries) हा असाच एक स्टॉक आहे. ICICI सिक्युरिटीजने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, Hindalco मध्ये लाँग टर्ममध्ये 550 रुपयांची पातळी दिसू शकते. सध्या Hindalco Industries चा शेअर 460 रुपयांच्या आसपास दिसत आहे.
ICICI Securities चे म्हणणे आहे की, खेळत्या भांडवलाच्या (Working Capital) वाढत्या गरजेमुळे कंपनीच्या कर्जात घट होण्याचा वेग कमी झाला आहे. मात्र आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी पहिल्या तिमाहीपेक्षा चांगली राहिली आहे आणि तिमाही आधारावर कंपनीचे निव्वळ कर्ज सुमारे 39 अब्ज रुपयांनी कमी झाले आहे.
औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप
ICICI सिक्युरिटीजने सांगितले की, EBITDA फ्रंटवर कंपनीची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. दुसर्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 75 अब्ज इतका होता, जो 69 अब्ज इतका असण्याचा अंदाज होता. कंपनीच्या अॅल्युमिनियम व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. कंपनीच्या उत्कल अॅल्युमिनियम प्लांटमध्ये आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन सुरू झाले असून, कंपनीची एकूण उत्पादन क्षमता 2.1mtpa झाली आहे.
अरबी समुद्रात पुन्हा नवं संकट; राज्यात पुढील 5 दिवस महत्त्वाचे, मुंबई-पुण्यालाही इशारा
याशिवाय, हिंदाल्कोने पॉलीकॅबसोबत (polycab) करार केला आहे ज्या अंतर्गत कंपनी पॉलीकॅबचा रायकर बेसमधील 100 टक्के स्टेक खरेदी करेल. रायकर बेसची किंमत आणि रोल केलेले कॉपर वायर रॉड उत्पादन क्षमता 225ktpa आहे. सध्या हा स्टॉक NSE 12.55 (-2.68%) च्या घसरणीसह 456 च्या पातळीवर ट्रेड करत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market