Home /News /money /

Bank Strike : महिनाअखेर बँका सलग चार दिवस बंद राहणार, गैरसोय टाळण्यासाठी कामे आधीच करुन घ्या

Bank Strike : महिनाअखेर बँका सलग चार दिवस बंद राहणार, गैरसोय टाळण्यासाठी कामे आधीच करुन घ्या

संपात जुन्या जमान्यातील खाजगी बँका, कांही विदेशी बँका, ग्रामीण बँक तसेच सहकारी बँकेतील कर्मचारी देखील या संपात सहभागी होत आहेत. या संपात स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे कर्मचारी सहभागी होणार नाहीत.

    मुंबई, 24 मार्च : देशातील कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सर्व मध्यवर्ती कामगार संघटना सहभागी होणार यात जवळपास जवळपास नऊ कोटी कामगार सहभागी होणार आहेत. यामुळे बँक सेवा देखील ठप्प होण्याची शक्यता आहे. शनिवार रविवार सुट्टी आणि त्यानंतर लगेच सोमवार 28 मार्च आणि मंगळवार 29 मार्च असे दोन दिवस संप यामुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसात संपामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. लोकांची अनेक कामं खोळंबण्याची शक्यता आहे. या संपात जुन्या जमान्यातील खाजगी बँका, कांही विदेशी बँका, ग्रामीण बँक तसेच सहकारी बँकेतील कर्मचारी देखील या संपात सहभागी होत आहेत. या संपात स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे कर्मचारी सहभागी होणार नाहीत. त्यामुळे या दोन बँका सोडता इतर सर्व बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. कोणत्या मागण्यांसाठी संपाची हाक बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध, बॅंकांमधील कंत्राटीकरण आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यांवर बॅंक कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत. सोबतच लोकसभेतील अधिवेशनात बॅंकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे. एप्रिलमध्येही बँकांना अनेक सुट्ट्या एप्रिलमध्ये अनेक बँकांना सुट्या असणार आहेत. म्हणजेच अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. तुमचे बँकेशी संबंधित काही काम असेल तर सुट्ट्या लक्षात घेऊन ते करुन घ्या. गुढीपाडवा, आंबेडकर जयंती आणि बैसाखी या सणांमुळे पुढील महिन्यात देशभरात 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. RBI ने एप्रिल 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank holidays, Bank strike

    पुढील बातम्या