मुंबई, 24 सप्टेंबर : तुम्ही नोकरी शोधताय, तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. ICICI बँक आपल्या शाखा वाढवणार आहे. बँक आपल्या ब्रँचेसची 10 टक्के वाढ करणार आहे. बँकेचे कार्यकारी अध्यक्ष अनुप बागची म्हणाले, शाखा विस्ताराच्या योजनेवर मंदीचा काही परिणाम होणार नाही. ते म्हणाले, 2020 पर्यंत ICICI बँकेला नेटवर्कला 5300 शाखांपर्यंत न्यायचंय. त्यासाठी 450 नव्या शाखा उघडल्या जातील. त्यात 3500 कर्मचारी असतील. प्रत्येक ब्रँचमध्ये जवळजवळ 7 ते 8 कर्मचारी नियुक्त केले जातील. त्यांनी सांगितलं की मंदीचा परिणाम बँकेवर पडलेला नाही. बँकेच्या या योजनेनं अनेकांना नोकऱ्या मिळू शकतात. SBI डेबिट कार्डानं तुम्ही ‘इतक्या’ वेळाच काढू शकता पैसे, नाही तर पडेल भुर्दंड आयसीआयसीआय (ICICI)नं आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिलाय. बँकेनं सांगितलंय की, ज्या ग्राहकांचं झीरो बॅलन्स खातं आहे त्या ग्राहकांनी बँकेच्या खात्यातून पैसे काढले तर 100 रुपयांपासून 125 रुपयांपर्यंत शुल्क द्यावं लागेल. तसंच, खातेधारक बँक ब्रँचमध्ये मशीनद्वारे पैसे जमा करत असतील तर त्यांनाही त्याचं शुल्क द्यावं लागेल. 16 ऑक्टोबरपासून हा चार्ज सुरू होईल. सोनं-चांदी झालं महाग, ‘हे’ आहेत मंगळवारचे दर ICICI बँकेनं शुक्रवारी रात्री आपल्या खातेधारकांसाठी एक नोटीस काढलीय. त्यात म्हटलंय की, आम्ही आमच्या ग्राहकांनी बँकिंग ट्रॅन्झॅक्शन डिजिटल मोडमध्ये करावं म्हणून प्रोत्साहन देतोय. यामुळे डिजिटल इंडिया या उपक्रमाला चालना मिळेल. दोन दिवसांनी मारुती सुझुकी कार होणार ‘इतक्या’ स्वस्त बँकेनं मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंगद्वारे होणाऱ्या एनईएफटी, आरटीजीएस तसंच युपीआय ट्रॅन्झॅक्शनवर लागणारं शुल्क बंद केलंय. ICICI बँकेच्या ब्रँचमधून 10 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयापर्यंतच्या मंजुरीवर ग्राहकांना 2.25 रुपयांपासून 24.75 रुपयांचा चार्ज द्यावा लागतो. ICICI बँकेच्या कुठल्याही बँकेतून 2 लाख रुपये ते 10 लाख रुपयांपर्यंत केलं जाणाऱ्या RTGS ट्रॅन्झॅक्शनसाठी 20 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत चार्ज द्यावा लागतो. तसंच GST द्यावा लागतो. VIDEO : वंचितशी ‘तलाक’ घेणाऱ्या जलील यांना आली जाग, आता म्हणतात…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.