• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • ICICI बँकेची ग्राहकांसाठी स्पेशल सुविधा; तुम्हालाच ठरवता येईल EMIची रक्कम, अशा प्रकारे मिळवाल सुविधेचा लाभ

ICICI बँकेची ग्राहकांसाठी स्पेशल सुविधा; तुम्हालाच ठरवता येईल EMIची रक्कम, अशा प्रकारे मिळवाल सुविधेचा लाभ

आपण घेतलेल्या वस्तूच्या किंमतीनुसार बँक ईएमआय म्हणजेच दरमहा भरायचा हप्ता ठरवते. पण, जर ही रक्कम तुम्हाला ठरवता आली तर?

  • Share this:
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट:  एखादी महागडी वस्तू विकत घेताना आपण बऱ्याच वेळा एकदम सगळी रक्कम देऊ शकत नाही. अशा वेळी आपण EMI चा पर्याय वापरतो. बरेचदा असं होतं, की या ईएमआयचे हफ्ते (EMI Instalments) एवढे मोठे होतात की आपला जवळपास सगळा पगार त्यातच निघून जातो. आपण घेतलेल्या वस्तूच्या किंमतीनुसार बँक ईएमआय म्हणजेच दरमहा भरायचा हप्ता ठरवते. त्यामुळे तुमच्या बँक खात्यातील रकमेतून तेवढी रक्कम कापली जाते. पण, जर ही रक्कम तुम्हाला ठरवता आली तर? आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank EMI Offer) ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणारी आयसीआयसीआय ही ग्राहकांसाठी सतत नवनवीन योजना आणत असते. अशीच एक खास सुविधा आयसीआयसीआयने आपल्या इंटरनेट बँकिंगवर (ICICI Internet Banking) उपलब्ध करुन दिली आहे. इंटरनेट बँकिंगच्या मदतीने आपण कोणतीही गोष्ट खरेदी केली, तर त्यावरील ईएमआयची रक्कम तुम्हालाच ठरवता (ICICI EMI amount) येणार आहे. त्यामुळे आपण आपला पगार आणि महिन्याचा खर्च इत्यादी गोष्टींचा विचार करुन त्यानुसार ईएमआय ठरवू शकणार आहे. पाच लाखांपर्यंतच्या रकमेवर ऑफर इंटरनेट बँकिंगमध्ये ईएमआय सुरू करणारी आयसीआयसीआय ही देशातील पहिली बँक आहे. बँकेचे प्री-अप्रूव्हड् कस्टमर्स (ICICI Pre-approved customers) आपल्या पाच लाखांपर्यंतच्या हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनला (High value transaction) हव्या तशा ईएमआयमध्ये बदलू शकतात. विशेष म्हणजे केवळ ऑनलाईन खरेदीसाठी नाही, तर इन्शुरन्स प्रिमियम भरण्यासाठी आणि फी किंवा इतर ट्रान्झॅक्शनसाठीही ही योजना लागू केली जाऊ शकते.

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या Aadhaar, पॅन कार्ड, पासपोर्ट अशा कागदपत्रांचं काय होतं? पाहा डिटेल्स

आयसीआयसीआय बँकेच्या प्री-अप्रूव्ह्ड कस्टमर्सना ही सुविधा घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची वा प्रोसेसची गरज नाही. यासाठी केवळ EMI@Internet Banking हा पर्याय निवडावा लागतो. याच्या अंतर्गत केवळ एका क्लिकवर लोन डिसबर्सल सुविधा मिळून जाते. यानंतर आपल्याला क्रेडिट किंवा लोनवर किती व्याज लागेल हे ग्राहक पाहू शकतात. व्याजदर आपल्याला हवा तसा आहे असं वाटल्यास केवळ का क्लिकमध्ये तुम्हाला लोन मिळू शकेल. विशेष म्हणजे, ही रक्कम भरण्यासाठी तुम्हाला पुढे पाच वर्षांपर्यंतचा कालावधी मिळतो. अशा प्रकारे मिळवाल सुविधा इंटरनेट बँकिंग या पर्यायाचा वापर करुन ईएमआय घेताना इजी इएमआय ऑन कार्ट व्हॅलू (EMI on cart value), किंवा प्री अप्रूव्ह्ड लोन ऑन कार्ट व्हॅलू (Pre-approved loan on cart value) असे दोन पर्याय मिळतात. हे करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या इंटरनेट बँकिंग पर्यायावर जावं लागेल. यानंतर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करुन, तुम्हाला आपल्या अकाऊंटला लॉगिन (Account Login) करावं लागेल. लॉगिन करण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड किंवा ओटीपीची मदत घेऊ शकता. पुढे ‘पे विथ ईएमआय’ हा पर्याय निवडा. यानंतर लोन अमाऊंट आणि ते भरण्याची मुदत निवडा. पुढे आयसीआयसीआय बँकेच्या खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. या ओटीपीचा वापर करुन तुम्ही पेमेंट कम्प्लीट करु शकता.

वर्षभरात 1 लाखाचे झाले 57 लाख रुपये, हा शेअर विकत घेणं ठरेल फायद्याचं 

सध्या आयसीआयसीआय ही सुविधा इन्शुरन्स, एज्युकेशन, ट्रॅव्हल आणि ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित एक हजारांहून अधिक मर्चंट्सच्या ट्रान्झॅक्शन्सवर देण्यात येत आहे.
Published by:Pooja Vichare
First published: