मुंबई, 26 जानेवारी: एकापाठोपाठ एक मोठ्या टेक कंपन्या टाळेबंदीची घोषणा करत आहेत. नुकतेच सर्च इंजिन गुगल वरून नोकर कपातीची बातमी समोर आली होती. दरम्यान आता मोठी टेक कंपनी IBM कडूनही अशीच बातमी येत आहे. सुमारे 3900 कर्मचाऱ्यांना ले-ऑफ प्रक्रियेचा भाग व्हावे लागल्याची माहिती कंपनीने दिली आहे. गेल्या बुधवारी, IBM कॉर्पोरेशनने नोकरीच्या कपातीची माहिती दिली होती. कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे कारणही कंपनीने सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ती यावेळी आपले एनुअल कॅश टार्गेट पूर्ण करू शकली नाही, एवढेच नाही तर चौथ्या तिमाहीत आपले टार्गेट रेव्हेन्यू साध्य करण्यातही कंपनी मागे पडली.
मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी कंपनीचे सीएफओ जेम्स कॅव्हनॉफ यांनी सांगितले की, कर्मचार्यांच्या छाटणीनंतरही कंपनी भरती प्रक्रिया सुरू ठेवेल. याशिवाय, कंपनीने सांगितले आहे की ले-ऑफमुळे, जानेवारी ते मार्च कालावधीसाठी 300 मिलियन डॉलरचा चार्ज देखील भरावा लागेल. कंपनीच्या शेअर्समध्येही 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
नवा व्यवसाय सुरु करायचाय? 'हे' लायसन्स घेऊन सुरु करा तुमची कंपनी
आयबीएमपूर्वी कर्मचार्यांच्या छाटणीबाबत गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. मात्र, यातील बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे कारण आर्थिक मंदीची भीती असल्याचे सांगितले आहे. टेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातच सुरू झाली होती. एका रिपोर्टनुसार, आता टेक कंपन्यांमधील सुमारे 1.50 लाख कर्मचाऱ्यांना छाटणी प्रक्रियेतून जावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job