मुंबई: घरातील ज्येष्ठ मंडळी त्यांच्या काळी पैशाला किती महत्त्व होतं? हे नेहमी सांगतात. 10 ते 20 पैशांत आमचा आठवड्याचा किराणा, बाजार होत होता, असंही ज्येष्ठांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं असेल. पण तुमच्यापैकी किती जणांनी एक पैसा, दोन पैसे, पाच पैसे आदींच नाणं पाहिलं किंवा वापरलं आहे? आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी काही जुनी नाणी शेअर करून लोकांना असाच प्रश्न विचारलाय. अवनीश शरण यांनी ट्विटरवर जुन्या नाण्यांचा फोटो शेअर केलाय. यासोबतच लोकांना प्रश्न विचारला की, ‘तुमच्यापैकी किती जणांनी ही जुनी नाणी पाहिली आहेत? तसेच त्यांनी पुढं विचारलं आहे की, ‘या पैकी कोणत्या नाण्यांमधून काही विकत घेतलं आहे का?’ हा प्रश्न असा आहे की, आजच्या पिढीतील बहुतेक लोकांकडे याचे उत्तर नाही. मात्र, जुन्या काळातील लोकांकडे या प्रश्नाचे उत्तर नक्कीच आहे.
Indian Railway Facts : प्लॅटफॉर्मजवळ पोहोचलेल्या ट्रेनला देखील सिग्नलला का थांबवलं जातं?काय आहे फोटोत? आयएएस अवनीश शरण यांनी 1968 नंतरच्या सहा वेगवेगळ्या नाण्यांचा फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून अनेकांना त्यांच्या भूतकाळ आठवला. फोटोत दोन पैसे, तीन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, पंचवीस पैसे आणि पन्नास पैसे अशी सहा नाणी दिसतात. हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये शरण यांनी लिहिलं आहे की,‘यापैकी कोणत्या नाण्यानं तुम्ही काय विकत घेतलं आहे?’ यानंतर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या आठवणी शेअर केल्यात. ही नाणी पाहिली नसल्याचं आजचे तरुण सांगत आहेत. तर काहींनी ‘आम्ही या नाण्यांमध्ये संपूर्ण जग विकत घ्यायचो’, अशी कमेंट केलीय. आज भारतातील सर्वांत कमी किमतीचं चलन ‘एक रुपया’ आहे. एक काळ असा होता की, एक पैसे, दोन पैसेसुद्धा चलनात होते. मात्र, आता ती भूतकाळातील गोष्ट झालीय. आजच्या पिढीमध्ये तर असे बरेच लोक आहेत, ज्यांनी जुनी नाणी पाहिलीसुद्धा नाहीत. अनेकदा ही नाणी पाहण्यास मिळाली की, ही मंडळी आश्चर्यचकित होतात.
पुराच्या पाण्यातून चालत आरामात ओलांडत होता नदी; अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEOघरातील ज्येष्ठ मंडळी अनेकदा सांगत असतात की, त्यांच्या काळात ते एक पैसा खर्च करून किती वस्तू आणू शकत होते. तर आता अशी परिस्थिती झाली आहे की, 100 रुपयांमध्येही फारच कमी वस्तू मिळतात. परंतु आजही अनेकांना जुन्या नाण्यांबाबत कौतुक असते. बऱ्याचजणांना तर अशी जुनी नाणी जमा करण्याचाही छंद असतो.

)







