मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पती-पत्नीचा नादचखुळा! नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय;काही दिवसांतच बनले कोट्याधीश

पती-पत्नीचा नादचखुळा! नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय;काही दिवसांतच बनले कोट्याधीश

Startup

Startup

सध्याच्या काळात नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला असा विचार समाजात रुजताना दिसत आहे. त्यातून स्टार्टअपची संख्या वेगानं वाढत आहेत. उद्यमशील तरुणांना सरकारकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. मार्केटचा अभ्यास, ग्राहकांची गरज आणि सरकारचं प्रोत्साहन या प्रमुख गोष्टींमुळे काही स्टार्टअप्सने अल्पावधीतच मोठं यश मिळवलं आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 25 जानेवारी- सध्याच्या काळात नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला असा विचार समाजात रुजताना दिसत आहे. त्यातून स्टार्टअपची संख्या वेगानं वाढत आहेत. उद्यमशील तरुणांना सरकारकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. मार्केटचा अभ्यास, ग्राहकांची गरज आणि सरकारचं प्रोत्साहन या प्रमुख गोष्टींमुळे काही स्टार्टअप्सने अल्पावधीतच मोठं यश मिळवलं आहे. ऑक्सिजो फायनान्स सर्व्हिसेस आणि ऑफबिझनेस हे दोन स्टार्टअप सध्या जोरदार चर्चेत आहेत. या दोन्ही स्टार्टअपचा समावेश युनिकॉर्न यादीत झाला आहे. विशेष म्हणजे एक दाम्पत्य हे दोन्ही स्टार्टअप स्वतंत्रपणे चालवत आहे. पती आणि पत्नी अशा दोघांची दोन्ही स्टार्टअप नफ्यात आहेत. या दोन्ही स्टार्टअपविषयी सविस्तर जाणून घेऊया. `लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे.

स्टार्टअपच्या दुनियेत कमी काळात यश मिळवणं खूप कठीण आहे. कारण सध्याच्या काळात स्टार्टअप उभं करणं आणि ते नफ्यात आणणं अशा दोन्ही गोष्टी खूप आव्हानात्मक आहेत. पण एका दाम्पत्याने हे आव्हान यशस्वीरित्या पेललं आहे. हे पती-पत्नी दोन वेगवेगळी स्टार्टअप चालवतात आणि दोघांची स्टार्टअप युनिकॉर्न यादीत समाविष्ट झाली आहेत. याचाच अर्थ त्यांच्या कंपन्या एक अब्ज डॉलरच्या बनल्या आहेत. ही दोन्ही स्टार्टअप नफ्यात आहेत, ही आणखी एक विशेष गोष्ट म्हणता येईल.38 वर्षांच्या रुची कालरा आणि 41 वर्षांचे आशिष मोहपात्रा हे दोघंही इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी आहेत. या दोघांची पहिली भेट मॅकेन्झी अँड कंपनीत झाली. या कंपनीत हे दोघंही कार्यरत होते. रुची ऑक्सिजो कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर आशिष ऑफबिझनेसमध्ये सीईओ आहेत. ही दोन्ही स्टार्टअप नफ्यात असून, युवा विकास कंपन्यांसाठी हे एक असामान्य यश मानलं जात आहे.

(हे वाचा:तुम्ही पेरची लागवड करू शकता का? कशी करायची आणि सर्वात जास्त कुठे होते, पाहा PHOTO )

रुची कालरा डिजिटल लोडिंग स्टार्टअप ऑक्सीजो फायनॅन्शियल सर्व्हिसेसच्या सह-संस्थापक आहेत. ``आम्ही अल्फा वेव्ह ग्लोबल, टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, नॉर्वोस्ट व्हेंचर पार्टनर्स आणि इतरांच्या नेतृत्वाखाली पहिल्या फंडिंग फेरीत 200 दशलक्ष डॉलर्स उभारले,`` असं रुची यांनी बुधवारी सांगितलं. दुसरीकडे त्यांचे पती आशिष यांच्या ऑफबिझनेसने सॉफ्टबँक कॉर्प आणि अन्य गुंतवणुकीतून हे मूल्य उभारले. तसंच देशातील स्टार्टअप उद्योगातील सर्वांत मोठ्या `सीरीज ए राउंड`मधील मॅट्रिक्स पार्टनर्स आणि क्रिएशन इन्व्हेंस्टमेंट्सनेदेखील ऑक्सिजोमध्ये गुंतवणूक केली आहे.

ऑक्सिजन आणि ओझोन या दोन्ही शब्दांमधून ऑक्सिजो हे नाव तयार झालं आहे. ऑक्सिजोची स्थापना रुची, आशिष आणि अन्य तिघांनी मिळून 2017 मध्ये केली. सुरुवातीला ऑक्सिजो ही ऑफबिझनेसची एक शाखा होती. ऑफबिझनेसची स्थापना 2016 मध्ये झाली. ``आम्हा दोघांना काहीतरी वेगळं करायचं होतं. स्वतःचा उद्योग सुरु करायचा होता. नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याचा विचार आमच्या मनात कायम असायचा. त्यामुळे आम्ही दोघांनी नोकरी सोडून उद्योग उभारण्याचा निश्चय केला,`` असं रुची यांनी सांगितलं.

``दोन्ही स्टार्टअपची ऑफिस वेगवेगळी आहेत आणि दोन्ही स्टार्टअपसाठी वेगवेगळ्या टीम करतात. मॅन्युफॅक्चरर आणि सब कॉन्ट्रॅक्टिंगसारखे पायाभूत उद्योग आमची लक्ष्य आहेत. दोन्ही कंपन्या दिल्लीनजीकच्या गुरुग्राम येथे आहेत. ऑक्सिजोमध्ये 500 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. पुरवठा साखळी विश्लेषणासाठी आमचे विशेष डाटा वेअरहाउस आहेत.या कंपनीने दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज वितरित केलं असून स्थापनेपासूनच ही कंपनी नफ्यात आहे, ``असं रुची यांनी सांगितलं.ऑक्सिजो डाटाची कमतरता भरून काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते आणि व्यवसायांना पर्चेस फायनान्स पुरवते. कंपनी कर्जाची उपलब्धता कमी असलेल्या देशात कॅश फ्लोवर आधारित कर्ज प्रदान करते. कारण येथील लहान आणि मध्यम व्यावसायिकांना खेळत्या भांडवलासाठी संघर्ष करावा लागतो. ऑफबिझनेस औपचारिकपणे ओएफबी टेक प्रायव्हेट म्हणून ओळखली जाते. लहान आणि मध्यम श्रेणीतील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात स्टील, डिझेल, अन्नधान्य आणि औद्योगिक रसायनांसारखा कच्चा माल पुरवते.

``गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सॉफ्टबँक आणि इतरांनी यात गुंतवणूक केली होती, त्याचे मूल्य आता एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. डिसेंबरमध्ये स्टार्टअपचे मूल्यांकन सुमारे पाच अब्ज डॉलरपर्यंत पोहचले. कारण सॉफ्टबँक आणि इतरांनी यात गुंतवणूक वाढवली``, असं आशिष यांनी सांगितलं.

First published:

Tags: Money, Startup, Startup Success Story