जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Supermarket Strategy: सुपरमार्केटमध्ये असा कापला जातो तुमचा खिसा कसा आणि तुम्हाला कळतंही नाही

Supermarket Strategy: सुपरमार्केटमध्ये असा कापला जातो तुमचा खिसा कसा आणि तुम्हाला कळतंही नाही

Supermarket Strategy: सुपरमार्केटमध्ये असा कापला जातो तुमचा खिसा कसा आणि तुम्हाला कळतंही नाही

सुपर मार्केटमधील काही गोष्टी खुप महत्त्वाच्या ठरतात ज्यामुळे आपला खर्च नकळतपणे वाढतो. तर आज काही बाबींवर बारीक नजर टाकूया जेणेकरुन सुपरमार्केटमध्ये गेल्यावर तुमचा अनावश्यक खर्च कमी होईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : शहरी भागांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत छोटे-मोठे सुपरमार्केट्स (Super Markets) उभे राहिलेले तुम्हाला दिसतील. दुकानात यादी घेऊन जाऊन सामान खरेदी करण्यापेक्षा सुपरमार्केटमध्ये जाऊन सामान खरेदी करण्यावर अनेकांचा कल असते. त्यामुळे गेल्या काही दिवसात डी मार्ट (D-Mart) किंवा इतर सुपरमार्केट आपल्या परिसरात आलेले दिसतील. मात्र सुपर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जाताना तुम्ही ठरवलेल्या बजेटपेक्षा नेहमी जास्त पैसे खर्च होतात, याचा कधी तुम्ही विचार केला का? यामध्ये सुपर मार्केटमधील काही गोष्टी खुप महत्त्वाच्या ठरतात ज्यामुळे आपला खर्च नकळतपणे वाढतो. तर आज काही बाबींवर बारीक नजर टाकूया जेणेकरुन सुपरमार्केटमध्ये गेल्यावर तुमचा अनावश्यक खर्च कमी होईल. रोज वापराच्या वस्तू लांब ठेवल्या जातात अशा गोष्टी तुम्ही एकत्र वापरता मात्र त्या वस्तू सुपरमार्केटमध्ये काही अंतरावर प्लेस केल्या जातात. जसं की ब्रेड आणि बटर आपण एकत्र वापरतो मात्र या वस्तू अनेकदा शेजारी नसतात. यामागचं कारण म्हणजे यातली एक वस्तू घेतल्यानंतर दुसरी घेण्यासाठी तुम्ही स्टोअरचा इतर भागही फिरता. या दरम्यान इतर वस्तू ठेवलेल्या असतात. यामुळे इतर वस्तू खरेदीची शक्यताही वाढते. Buy 1 Get Two ऑफर्स सुपरमार्केटमध्ये गेल्यावर अशा अनेक वस्तू असतात ज्या आपण ऑफरमध्ये आहेत म्हणून किंवा एकावर एक फ्री आहेत म्हणून खरेदी करतो. म्हणजे आपल्याला एकाची गरज असते मात्र आपण एक किंवा अधिक खरेदी करतो. अनेकदा आपण ती वस्तू खरेदी करण्याचा विचारही करत नसतो मात्र ऑफरमुळे आपला खरेदीचा विचार होतो. Facebook Alert! लगेच अ‍ॅक्टिवेट करा महत्त्वाचं फीचर,नाहीतर लॉक होईल तुमचं अकाउंट शॉपिंग कार्टचा आकार सुपरमार्केटमधील शॉपिंग कार्ट आणि बास्केटही (Shopping Cart and Basket) मोठ्या असतात. ज्यावेळी आपण सामान यामध्ये टाकतो त्यावेळी शॉपिंग कार्ट किंवा बास्केटच्या तुलनेत सामान कमी दिसतं. त्यामुळे आपण अजून काही खरेदीच केली नाही अशी मानसिकता होते आणि आपली शॉपिंग नकळत वाढते. रोजच्या वापराच्या वस्तू लांब ठेवतात सुपरमार्केटमध्ये वस्तूच्या ठेवीची रचना पाहिली तर रोजच्या वापराच्या वस्तू म्हणजे डाळी, तेल, गहू, तांदूळ अशा वस्तू लांब ठेवलेल्या असतात. तर चॉकलेट, बिस्किट, कोल्डड्रिंक्स, चिप्स अशा वस्तू जवळ ठेवलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला या वस्तू खरेदी करायच्या नसतात मात्र तुम्ही खरेदी करता. PAN Card Correction: घरबसल्या दुरुस्त करा पॅन कार्डमधील चूका, पाहा सोपी पद्धत बिलिंग काऊंटरवर हाय मार्जिन वस्तू चेक आऊट काऊंटवर बिल भरण्यासाठी लांब लांब रांगा लागतात तिथे हाय मार्जिन वस्तू ठेवलेल्या असतात. ज्यावळी तुम्ही रांगेत उभे असता त्यावेळी तुमची नजर त्यावर पडते. आणि विचार नसतानाही यातील एखादी तरी वस्तू तुम्ही खरेदी करता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात