नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : नोकरी बदलल्यानंतर पीएफ ट्रान्सफर (PF Transfer) करणं अतिशय महत्त्वाचं काम आहे. अनेकदा हे काम न झाल्याने पुढे समस्या येऊ शकतात. तुम्ही पीएफ ऑनलाइनही ट्रान्सफर (Online PF Transfer) करू शकता. ही प्रक्रिया सोपी असून यासाठी घरबसल्या अर्ज करता येऊ शकतो.
हे वाचा - ‘या’ योजनेअंतर्गत दुकानदारांना मिळेल पेन्शन; कसं कराल रजिस्ट्रेशन?
ऑनलाइन PF ट्रान्सफर - - यूनिफाइड मेंबर पोर्टल (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface) वर जा. इथे UAN नंबर टाकून लॉगइन करा. - ऑनलाइन सर्विससाठी वन मेंबर वन EPF वर क्लिक करावं लागेल. आता तुम्हाला कंपनीची माहिती आणि पीएफ खातं वेरिफाय करावं लागेल. - त्यानंतर Get Details पर्यायावर क्लिक करा. मागील नोकरीतील PF Account Details दिसतील. - आता मागील कंपनी किंवा सध्याच्या कंपनीपैकी एकाची निवड करावी लागेल. दोन्हीपैकी कोणत्याही एका कंपनीची निवड करुन मेंबर आयडी किंवा UAN द्या. - सर्वात शेवटी Get OTP वर क्लिक करा. UAN मध्ये रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल. OTP टाकून सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. अशाप्रकारे EPF अकाउंटची ऑनलाइन प्रोसेस पूर्ण होईल.
हे वाचा - iPhone 13 च्या नावे Online Fraud, Instagram वर अनेक युजर्स स्कॅमर्सच्या जाळ्यात
या गोष्टी लक्षात ठेवाच - - कर्मचाऱ्याचं UAN EPFO पोर्टल https://unifiedportal- mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर अॅक्टिवेट असणं गरजेचं आहे. - अॅक्टिवेट करण्यासाठी वापरलेला मोबाइल नंबरही अॅक्टिव्ह असावा. कारण OTP याच नंबरवर पाठवला जातो. - कर्मचाऱ्याचा बँक अकाउंट नंबर आणि आधार नंबर त्याच्या UAN सह लिंक असावा. - मागील नोकरीवरील Date of Exit आधीच असावी. जर नसेल तर ती आधी अपडेट करावी. - कंपनीकडून eKYC मंजूर असावं. मागील मेंबर आयडीसाठी केवळ एक ट्रान्सफर रिक्वेस्ट मंजूर केली जाईल. - अप्लाय करण्याआधी मेंबर प्रोफाइलमधीस सर्व पर्सनल माहिती वेरिफाय आणि कन्फर्म करा.